शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलीयमजन्य पदार्थांची चोरी करणारी चार टँकरसह  टोळी जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 00:58 IST

अंबरनाथच्या खोणी भागात उभ्या असलेल्या टँकरमधून पेट्रोलीयमजन्य पदार्थांची चोरी करणाऱ्या गयानचंद वर्मा (३२, रा. शिवडी पुर्व, मुंबई) याच्यासह सात जणांच्या टोळीला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने बुधवारी अटक केली.

ठळक मुद्दे ठाणे खंडणी विरोधी पथककाची कारवाईएक कोटी तीन लाख आठ हजारांचा मुददेमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: अंबरनाथच्या खोणी भागात उभ्या असलेल्या टँकरमधून पेट्रोलीयमजन्य पदार्थांची चोरी करणाऱ्या गयानचंद वर्मा (३२, रा. शिवडी पुर्व, मुंबई) याच्यासह सात जणांच्या टोळीला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने बुधवारी अटक केली. या टोळीकडून पेट्रोलजन्य पदार्थ आणि चार टँकरसह एक कोटी तीन लाख आठ हजारांचा मुददेमाल जप्त केल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी गुरुवारी दिली.अंबरनाथच्या खोणी भागातील रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकमधील पेट्रोल तसेच डिझेल चोरी करणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाचे पोलीस हवालदार संजय बाबर यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय शिंदे, सुधाकर हुंबे, उपनिरीक्षक थॉमस डीसोझा, हवालदार बाबर, कल्याण ढोकणे आणि तानाजी पाटील आदींच्या पथकाने १९ जानेवारी २०२२ रोजी या भागात सापळा रचून वर्मा तसेच अमन सरोजा (२२) संजय सिंह (३४), प्रयागसिंह उर्फ रविसिंह सिंग (३४), अंसर वर्मा, (३४ ) सदिप वर्मा, (२६), अनिल चिकणकर (३०, रा. अंबरनाथ) यांना २६ टनाचे दोन, २१ टनाचा एक आणि तीन टनाचा एक अशा चार पेट्रोलियम पदार्थांच्या टँकरसह अटक केली. यातील अनिल चिकणकर वगळता इतर सर्व मुंबईतील शिवडी येथील रहिवाशी आहेत. त्यांच्याविरुद्ध हिललाईन पोलीस ठाण्यात चोरी तसेच पेट्रोलीयम उत्पादने (देखभाल उत्पादन, साठवणुक, पुरवठा व विक्री) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास खंडणी विरोधी पथकाकडून करण्यात येत आहे.* या टोळीला २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. त्यांच्याकडून डिझेल म्हणून वापरात येणारे बेस आईल जप्त केले आहेत. या डिझेलची ही टोळी काळया बाजारात विक्री करीत असल्याची माहिती समोर आली आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्र