गणेशपुरी : मीनलची आत्महत्या नसून खून
By Admin | Updated: December 10, 2015 01:42 IST2015-12-10T01:42:49+5:302015-12-10T01:42:49+5:30
दोन महिन्याच्या आत लग्न करण्याचे आश्वासन देणाऱ्या प्रियकराच्या मनांत प्रेयसीच्या चारित्र्याचा संशय आल्याने त्यानेच तिचा खून केल्याचे उघड झाले आहे.

गणेशपुरी : मीनलची आत्महत्या नसून खून
भिवंडी : दोन महिन्याच्या आत लग्न करण्याचे आश्वासन देणाऱ्या प्रियकराच्या मनांत प्रेयसीच्या चारित्र्याचा संशय आल्याने त्यानेच तिचा खून केल्याचे उघड झाले आहे. गणेशपुरी पोलीस पोलिसांनी प्रियकर कुणाल वाल्मिक पाटील (२४) यांस गजाआड केले आहे. त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
शहापूर तालुक्यातील शेडगाव येथे मामाकडे राहणारी मिनल दिनेश दुभेळे हिचे वर्षभरापासून तालुक्यातील कशेळी येथील कुणाल वाल्मिक पाटील याच्यासोबत प्रेमप्रकरण सुरू होते. दोन्ही कुटुंबांनी त्यांचे दोन महिन्यात लग्न लावण्याचे ठरविले होते. ३ डिसेंबर २०१५ रोजी रात्री कुणालने फोन करून मिलनला अकलोली येथे फिरण्यास बोलाविले.
शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता मिनल अंबाडीनाका येथे आली असता कुणाल तिला घेऊन अकलोली येथील संगीता लॉजमध्ये गेला. तेथे त्याने तिच्या चारित्र्यावर संशय घेतल्याने दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्याच रागांत कुणालने मिनलला थंड पेयातून विषारी औषध दिले. त्या औषधाचा तिच्यावर परिणाम होत नसल्याचे पाहुन शेवटी तिच्याच ओढणीने गळा आवळून तिला ठार केले आणि मिनलने ओढणीने गळफास केल्याचा बनाव केला. (प्रतिनिधी)