उपवासाच्या २१ पदार्थांचा गणेश

By Admin | Updated: September 13, 2016 01:56 IST2016-09-13T01:56:11+5:302016-09-13T01:56:11+5:30

नालासोपाऱ्यातील नवयुवक गणेश मित्र मंडळाने यंदा उपवासाच्या २१ पदार्थापासून गणपतीची सुंदर मूर्ती साकारली आहे. या मंडळाचें यंदाचे २१ वे वर्ष होते

Ganesha of fasting 21 substances | उपवासाच्या २१ पदार्थांचा गणेश

उपवासाच्या २१ पदार्थांचा गणेश

वसई : नालासोपाऱ्यातील नवयुवक गणेश मित्र मंडळाने यंदा उपवासाच्या २१ पदार्थापासून गणपतीची सुंदर मूर्ती साकारली आहे. या मंडळाचें यंदाचे २१ वे वर्ष होते. त्यामुळे २१ पदार्थांचा वापर करण्यात आला आहे.
रताळे, सुपारी, बटाटा, चारोळी, काजू, बदाम, पिस्ता, शेंगदाणे व सुका मेवा हा गणपती बनवण्यासाठी वापरण्यात आला आहे. विशेष म्हणजे मुर्तीकार दुसरा तिसरा कोण नसून, मंडळातील एक कार्यकर्ता आहे. दहा दिवसाच्या अविरत मेहनतीनंतर ही मूर्ती साकारली आहे. उपवासात आपण देव शोधतो.
मात्र या मंडळाने देवात उपवासाचे पदार्थ दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मुर्ती साडे सात फुटाची असून, संपूर्ण मूर्ती इको फ्रेण्डली आहे. या २१ उपवासाच्या पदार्थांची नावे ही मंडळाने लिहली आहेत. मात्र यातील एका पदार्थाच नाव लिहलं गेलं नाही. ते महिलांनी ओळखून, सांगायचं आहे. त्यावर बक्षीस ही मंडळाने ठेवलें आहे. सध्या या अनोख्या गणेश प्रतीमा बघण्यासाठी भक्तगणांची गर्दी वाढत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Ganesha of fasting 21 substances