जुगार खेळणाऱ्यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:30 IST2021-02-22T04:30:23+5:302021-02-22T04:30:23+5:30
उल्हासनगर : शहरातील आवत चौक येथील सार्वजनिक स्वच्छतागृहामागे सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर शनिवारी दुपारी ४ वाजता पोलिसांनी छापा टाकला. ...

जुगार खेळणाऱ्यांना अटक
उल्हासनगर : शहरातील आवत चौक येथील सार्वजनिक स्वच्छतागृहामागे सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर शनिवारी दुपारी ४ वाजता पोलिसांनी छापा टाकला. मटक्याचे साहित्य, रोख रकमेसह कृष्णा शिंपी व राजेश वळखाणी यांना अटक केली असून, उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
----
चॉपरचा धाक दाखवून तरुणाला लुटले
उल्हासनगर : १७ सेक्शन चौकातून शनिवारी रात्री २ वाजता प्रमोदकुमार साव हे घरी जात असताना मनीष रॉय व धर्मेंद्र यांनी चॉपरचा धाक दाखवून खिशातून पाच हजार रुपये काढून घेतले. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत.
----
४० हजारांची घरफोडी
उल्हासनगर : हिललाइन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील द्वारली गावात सागर अहिरे यांचे घर असून, चोरट्यांनी शनिवारी भरदिवसा घराचे दार उघडून कपाटातून सात हजार रकमेसह सोन्याचे दागिने असे एकूण ४० हजारांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी हिललाइन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
----
गावठी कट्ट्याचा धाक दाखवून धमकी
उल्हासनगर : हिललाइन पोलीस ठाण्याच्या हद्दीत बलवंतसिंग कसब यांचा बबलू नावाचा ढाबा आहे. गुरुवारी मध्यरात्री ३ वाजता नीलेश गुप्ता याने ढाब्यावर येऊन जेवण मागितले. ढाबा बंद असल्याचे सांगितल्याचा नीलेश याला राग आला. त्याने गावठी कट्टा दाखवून धमकी दिली. या प्रकरणी हिललाइन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
-----