दुकानदारांना लुटणारा गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:36 IST2021-07-26T04:36:16+5:302021-07-26T04:36:16+5:30

डोंबिवली : दुकानदारांना खरेदी आणि बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडील पैसे घेऊन पसार झालेल्या चोरट्याला विष्णुनगर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने गजाआड ...

Gajaad robbing shopkeepers | दुकानदारांना लुटणारा गजाआड

दुकानदारांना लुटणारा गजाआड

डोंबिवली : दुकानदारांना खरेदी आणि बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडील पैसे घेऊन पसार झालेल्या चोरट्याला विष्णुनगर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने गजाआड केले आहे. गिरीष वामन गायकर (वय २९) असे त्याचे नाव आहे. तो पूर्वेतील गोळवली परिसरात राहणारा आहे.

गिरीषने डोंबिवली पश्चिमेतील ग्लोबल मेडिकल स्टोअरमध्ये असलेल्या रश्मी दिनेश पारेकर यांना सामान खरेदीच्या बहाण्याने बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडून दाेन हजार रुपये घेऊन तो पसार झाला होता. याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश वडणे व त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही कॅमेरे आणि खबऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून गिरीषला घरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. आतापर्यंत त्याने चार ठिकाणी अशा प्रकारे दुकानदारांना बोलण्यात गुंतवून लुबाडल्याचे तपासात समोर आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साबळे यांनी दिली.

Web Title: Gajaad robbing shopkeepers