ज्वेलर्सची फसवणूक करणारा आरोपी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:37 IST2021-08-01T04:37:02+5:302021-08-01T04:37:02+5:30

डोंबिवली : पूर्वेतील इंदिरा गांधी चौकानजीक असलेल्या नार्वेकर ज्वेलर्समध्ये सोन्याचे दागिने खरेदी केल्यानंतर दुकानदाराला बँकेतून एनईएफटीद्वारे पैसे पाठविले आहेत, ...

Gajaad accused of cheating jewelers | ज्वेलर्सची फसवणूक करणारा आरोपी गजाआड

ज्वेलर्सची फसवणूक करणारा आरोपी गजाआड

डोंबिवली : पूर्वेतील इंदिरा गांधी चौकानजीक असलेल्या नार्वेकर ज्वेलर्समध्ये सोन्याचे दागिने खरेदी केल्यानंतर दुकानदाराला बँकेतून एनईएफटीद्वारे पैसे पाठविले आहेत, असे खोटे मेसेज दाखवून व बनावट धनादेश देऊन सोने घेऊन एक आरोपी गुरुवारी फरार झाला होता. या आरोपीला गुन्हे अन्वेषण शाखा घटक ३ कल्याणच्या पोलीस पथकाने २४ तासांत अटक केली.

या संदर्भात पोलिसांनी सांगितले की, या चोरीचा गुन्हा रामनगर पोलीस ठाण्यात २९ जुलैला दाखल झाला होता. त्याची दखल घेत दुकानातील सीसीटीव्ही फुटेज व मोबाइल फोनचे तांत्रिक विश्लेषण करून गुन्हे शाखा घटक ३ कल्याणच्या पथकाने गुन्हा दाखल झाल्यानंतर २४ तासांच्या आत आरोपी विनय लोहिरे (३८) याचा शुक्रवारी अंबरनाथ परिसरात शोध घेत त्यास शिताफीने अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन मुदगुन, मोहन कळमकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

----------

Web Title: Gajaad accused of cheating jewelers