शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

जवाहरबाग स्मशानभूमीत १०२२ कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार?, महापालिकेने जाहीर केले ५८९ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 20:23 IST

ठाणे : महापालिका क्षेत्रात कोरोनाने ५८९ नागरिकांचा मृत्यू झाला असल्याचे प्रशासनाने जाहीर केले असताना, केवळ जवाहरबाग स्मशानभूमीत कोरोनाच्या संसर्गाने ...

ठाणे : महापालिका क्षेत्रात कोरोनाने ५८९ नागरिकांचा मृत्यू झाला असल्याचे प्रशासनाने जाहीर केले असताना, केवळ जवाहरबाग स्मशानभूमीत कोरोनाच्या संसर्गाने मृत झालेल्या १०२२ नागरिकांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत, असा आरोप भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केला आहे. तसेच या प्रकरणी चौकशी करून जनतेपुढे खरी संख्या जाहीर करण्याची मागणी केली आहे.ठाणे शहराला कोरोनाने विळखा घातला असून, ठाणे शहरात कोरोनामुळे दररोज बळी पडणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. सुरुवातीपासून कोरोना मृतांवर जवाहरबाग स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार केले जातात. कालांतराने शहरातील अन्य स्मशानभूमीत ही व्यवस्था करण्यात आली. या ठिकाणी कोरोना मृतांचे दहन करण्यासाठी पाच ते सहा तासांची प्रतिक्षा करावी लागत होती, याकडे नारायण पवार यांनी लक्ष वेधले.जवाहरबाग स्मशानभूमीतील नोंदीवरून घेतलेल्या माहितीत २० मार्चपासून २८ जुलैपर्यंत १०२२ रुग्णांवर अंत्यसंस्कार झाल्याची नोंद आहे. महापालिकेने २८ जुलै रोजी जाहीर केलेल्या पत्रकात ठाणे महापालिका क्षेत्रात आतापर्यंत १७ हजार ६० नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यातील १२ हजार ५१५ नागरिक उपचार घेऊन घरी परतले. तर ५ हजार ४५ रुग्णांवर अजून उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत ५८९ जणांचा मृत्यू झाला असल्याचे म्हटले आहे. मात्र, जवाहरबागमध्ये कोरोनासाठी राखीव असलेल्या रुग्णालयातून १०२२ मृतदेह आल्याची नोंद आहे. त्याव्यतिरिक्त मुस्लिम धर्मियांची संख्या वेगळी असल्याचे समजते, असे नगरसेवक नारायण पवार यांनी पत्रात म्हटले आहे. या प्रकरणी प्रशासनाने चौकशी करून कोरोनाने बळी पडलेल्या नागरिकांची खरी संख्या जाहीर करावी, अशी मागणी नारायण पवार यांनी आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.-------------------------------------------------राज्य सरकार, महापालिकेत कोरोना रुग्ण आकड्यांमध्ये तफावत राज्य सरकार व महापालिकेकडून कोरोना मृतांची संख्या व एकूण रुग्णांच्या संख्येत तफावत कायम आहे. याबाबत गेल्या चार महिन्यांत महापालिका प्रशासनाकडून खुलासा केलेला नाही. सध्याही राज्य सरकारकडून मृतांची संख्या ६८१ जाहीर करण्यात आली. तर महापालिकेकडून ५८९ जणांचा बळी गेल्याचे म्हटले आहे. एकूण रुग्णांच्या संख्येतही सुमारे दोन हजार रुग्णांची तफावत आहे, याकडे नारायण पवार यांनी लक्ष वेधले आहे.