शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

नोंदणीअभावी मंडळाकडील निधी पडून

By admin | Updated: November 16, 2015 02:12 IST

खाजगी तसेच सार्वजनिक क्षेत्रातील बांधकाम मजूर व कुटुंबियांच्या कल्याणासाठी स्थापन झालेल्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे आजमितीस

मीरारोड : खाजगी तसेच सार्वजनिक क्षेत्रातील बांधकाम मजूर व कुटुंबियांच्या कल्याणासाठी स्थापन झालेल्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे आजमितीस ३ हजार कोटी रुपयांचा निधी जमा असतानाही बहुतांश कष्टकरी कामगारांची नोंदणी झालेली नसल्याने या निधीचा त्या कामगारांना लाभ मिळत नसल्याने नगरविकास विभागाने नाका कामगारांची नोंदणी करून त्यांना प्रमाणपत्र देण्याचे फर्मान काढले आहे.बांधकाम प्रकल्पांच्या एकूण खर्चाच्या एक टक्के रक्कम याप्रमाणे गेल्या चार वर्षात ३ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मंडळाकडे जमा झाला आहे. कामगारांच्या घामातून कोटी कोटी उड्डाणे घेणाऱ्या या श्रीमंत मंडळाकडे मात्र लक्षावधी कष्टकरी कामगारांची नोंदणीच नसल्याने कामगारांऐवजी विमा कंपनीसह ठेकेदारांचेच कल्याण होत आहे. कामगार विभागाने गेल्या वर्षी अधिसूचना काढूनही मनपा, नगरपालिकांनी दाद न दिल्याने नगरविकास विभागाने परिपत्रक काढून डिसेंबर २०१५ पर्यंत नाका कामगारांना प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले आहेत. राज्यातील मोठ्या संख्येने असंघटीत असलेल्या इमारत बांधकाम व अन्य कामगारांच्या कल्याणासाठी २०११ साली राज्य शासनाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन केले. राज्यातील सर्व खाजगी वा सार्वजनिक इमारतींचे बांधकाम तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग आदी बांधकाम प्रकल्पाच्या खर्चाच्या एक टक्के उपकर आकारुन ती रक्कम या मंडळाकडे जमा केली गेली. या रकमेतून कामगार व त्यांच्या कुटुंबियांकरीता विविध विमा सुरक्षा, शिक्षण, आरोग्य, प्रसूती तसेच मुलींसाठी अनामत ठेव रक्कम आदी प्रकारच्या १६ योजना मंडळाकडून राबवण्यात येतात. गेल्या ४ वर्षात मंडळाच्या खात्यात तब्बल ३ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम उपकराच्या रुपाने जमा झाली आहे. परंतु प्रत्यक्षात कामगारांच्या कल्याणासाठी जेमतेम २०० कोटी रुपये खर्च केले गेले. कामगाराची मंडळाकडे नोंदणी करण्यासाठी किमान ९० दिवस काम करणे आवश्यक आहे. परंतु खाजगी इमारती बांधणारे विकासक व सार्वजनिक बांधकामाचे ठेके घेणारे ठेकेदार हे मजुरांची कामगार विभाग वा मंडळाकडे माहिती देणे टाळतात. त्यातच लाखो नाका कामगार रोजंदारीवर काम करीत असले तरी त्यांची नोंदणीच शक्य होत नाही. यामुळे लाखो बांधकाम कामगार व त्यांचे कुटुंबिय विविध योजनांपासून वंचित आहेत. काम करताना अनेकांचे जीव गेले तर अनेकांना अपंगत्व आले. त्यांना उपचासाठीचा खर्च देखील पोटाला चिमटा काढून करावा लागतोय. मुलांचे शिक्षण तर दूरच राहिले आहे.छत्तीसगडसारख्या लहानशा राज्यात ३६ लाख कामगारांची नोंदणी झालेली असताना महाराष्ट्रात मात्र जेमतेम ३ लाख कामगारांची देखील नोंदणी होत नाही. राज्यात सुमारे ५० लाख बांधकाम कामगार कार्यरत असल्याचा अंदाज आहे. मागील पावसाळी अधिवेशनात कामगार मंत्री प्रकाश मेहता यांनी देखील कामगारांची नोंदणी व पर्यायाने त्यांच्यासाठी होणारा खर्च तुटपुंजा असल्याचे मान्य करत नोंदणीसाठी विशेष मोहीम राबविणार असल्याचे म्हटले होते. ग्रामसेवक प्रमाणपत्र देण्यास उदासीन१३ आॅगस्ट २०१४ रोजी कामगार खात्याने अधिसूचना प्रसिध्द केली. रोजंदारी वा अस्थायी स्वरुपाचे काम असल्याने कामगारांना एकापेक्षा जास्त मालकांकडे काम करावे लागते. अशा इमारत व बांधकाम कामगाराला ग्रा.पं.मध्ये ग्रामसेवकाने तर महापालिका वा नगरपालिकेत आयुक्त वा मुख्याधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या प्राधिकृत अधिकाऱ्याने बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र देण्याचे स्पष्ट केले होते. परंतु त्याची अमंलबजावणी होते आहे तरी कुठे ?