शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

धारावी किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर, ८४ लाख येणार खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2019 05:15 IST

पुरातत्त्व विभागाची मंजुरी : ८४ लाख येणार खर्च

मीरा रोड / भाईंदर : भाईंदरच्या चौक परिसरातील ऐतिहासिक पण दुर्लक्षित अशा धारावी किल्ल्याच्या जतन व दुरुस्तीसाठी पुरातत्त्व विभागाने ८४ लाखांचा निधी मंजूर केला आहे. किल्ल्याचे काम लवकरच सुरू केले जाईल, असे विभागाने युवा प्रतिष्ठान संस्थेचे गणेश बामणे यांना लेखी कळवले आहे. त्यामुळे धारावी किल्ल्याची दुरवस्था संपेल, अशी आशा दुर्गप्रेमींनी व्यक्त केली आहे.

ऐतिहासिक वारसा असलेला व संरक्षित स्मारक असूनही धारावी किल्ल्याकडे सरकारच्या पुरातत्त्व विभागासह महापालिका, लोकप्रतिनिधी, पोलीस आदींनी सातत्याने दुर्लक्ष चालवले होते. त्यामुळे किल्ला असुरक्षित होऊन मद्यपी, व्यसनींचा अड्डा बनला. झुडुपे वाढून बांधकामाचे नुकसान केले गेले. किल्ल्याची दुरवस्था रोखण्यासह त्याचे पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी युवा प्रतिष्ठानसह दुर्गप्रेमींनी श्रमदान करून किल्ल्याची साफसफाई चालवली आहे. किल्ल्याची डागडुजी व सुरक्षा करण्यासाठी प्रतिष्ठानच्या वतीने सरकारकडे व सतत पाठपुरावा चालवला होता. अखेर, पुरातत्त्व विभागाने धारावी किल्ला हा संरक्षित स्मारक असल्याचे स्पष्ट केले आहे. किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी ८४ लाखांची मंजुरी मिळालेली असून किल्ल्याचे काम लवकरच सुरू करण्यात येईल, असे संचालक डॉ. तेजस गर्गे यांनी गणेश बामणे यांना कळवले आहे.नरवीर चिमाजी अप्पा यांच्या वसई मोहिमेच्यावेळी ३० नोव्हेंबर १७३७ रोजी मराठ्यांनी चार हजार सैनिक व १०० घोडेस्वारांच्या मदतीने धारावी किल्ला जिंकला होता. पण, पोर्तुगीजांनी २८ नोव्हेंबर १७३८ ला धारावीला धडक मारून तो पुन्हा ताब्यात घेतला.६ मार्च १७३९ रोजी मराठ्यांनी परत धारावीचा किल्ला जिंकून घेतला. पुढे १८१८ मध्ये या किल्ल्याचा ताबा इंग्रजांकडे गेला, अशी इतिहासात नोंद आहे.सलग १४ महिने स्वच्छता मोहीमयुवा प्रतिष्ठान या संस्थेने सलग १४ महिन्यांपासून प्रत्येक शनिवारी व रविवारी धारावी किल्ल्यावर संवर्धन आणि स्वच्छता मोहीम राबवली असल्याचे बामणे म्हणाले. 

टॅग्स :thaneठाणेFortगडThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका