मुलीचा संसार विस्कटल्याने निराश आईची आत्महत्या
By धीरज परब | Updated: August 24, 2023 19:56 IST2023-08-24T19:56:23+5:302023-08-24T19:56:37+5:30
मीरारोड - मुलीचा संसार विस्कटल्याने निराश झालेल्या आईने इमारतीच्या गच्ची वरून उडी मारून आत्महत्या केली. मीरारोडच्या शांती नगर सेक्टर २ ...

मुलीचा संसार विस्कटल्याने निराश आईची आत्महत्या
मीरारोड - मुलीचा संसार विस्कटल्याने निराश झालेल्या आईने इमारतीच्या गच्ची वरून उडी मारून आत्महत्या केली. मीरारोडच्या शांती नगर सेक्टर २ मधील प्रेमकीर्ण इमारतीत मीना दमानी ह्या ७१ वर्षीय वृद्ध महिला राहतात. त्यांची मुलगी वर्षा पारेख ( ४४ ) यांचे वैवाहिक जीवन अस्थिर झाले आहे. गेल्या ७ वर्षां पासून मुलगी आणि जावई यांच्यात वाद असल्याने वेगळे राहतात. त्यांच्यात कौटुंबिक न्यायालयात वाद सुरु आहेत.
त्यामुळे मुलीचे कसे होणार या विचाराने मीना ह्या नैराश्येत होत्या. बुधवारी त्यांनी रहात असलेल्या चार मजली इमारतीच्या गच्ची वरून खाली उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी नया नगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भगवान पाटील हे अधिक तपास करत आहेत.