शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

शिंदेसेनेला स्वबळापासून रोखण्यासाठी मोर्चेबांधणी; ठाण्यात भाजपने अजित पवार गटाला घेतले सोबत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 09:25 IST

ठाण्यातील चारही विधानसभा मतदारसंघांत एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची ताकद आहे. कळव्यातील आव्हाड समर्थक नगरसेवकांचा एक मोठा गट काही दिवसांपूर्वी शिंदेसेनेत सहभागी झाला.

- अजित मांडकेलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : एकनाथ शिंदे यांच्या ठाणे या गडात त्यांना शह देण्याकरिता भाजपने उघडपणे अजित पवार गटाला सोबत घेतले आहे. ठाण्यात ठाकरे बंधूंची युती व त्यांना असलेली शरद पवार गट व काँग्रेसची साथ यामुळे शिंदे यांची स्वबळावरील घोडदौड रोखण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यानुसार महापालिकेतील भ्रष्टाचार, रस्त्यांवरील खड्डे, वाहतूककोंडी अशा मुद्द्यांवरून शिंदेसेनेला भाजप व उद्धवसेना दोन्ही पक्ष घेरण्याचा प्रयत्न करीत आहेत.

जुने ठाणे हा पूर्वी शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात होता. महापालिकेत सत्ता स्थापनेच्या दृष्टीने हाच पट्टा महत्त्वाचा मानला गेला. मागील काही वर्षांपासून शिवसेनेची जादू ओसरून याठिकाणी भाजपचा वरचष्मा दिसून आला. मागील निवडणुकीत भाजपने काही नवखे चेहरे देऊन त्यांना विजयी केले.  विधानसभा निवडणुकीत ठाणे मतदारसंघातून संजय केळकर ५८,२५३ मतांच्या फरकाने निवडून आले. याठिकाणी उद्धवसेनेचे राजन विचारे यांना ६२,१२०, तर मनसेच्या उमेदवाराला ४२,५९२ मते मिळाली. ठाकरे बंधूंच्या पक्षाच्या उमेदवारांच्या मतांच्या बेरजेपेक्षा अधिक मते केळकर यांना मिळाली होती. त्यामुळे शिंदेंना वेसण घालण्याकरिता भाजपने मनसे अथवा उद्धवसेनेच्या उमेदवारांना बळ पुरवले, तर जुन्या ठाण्यात शिंदेंना हादरा बसू शकतो. 

ठाण्यातील चारही विधानसभा मतदारसंघांत एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची ताकद आहे. कळव्यातील आव्हाड समर्थक नगरसेवकांचा एक मोठा गट काही दिवसांपूर्वी शिंदेसेनेत सहभागी झाला. त्यामुळे शिंदे यांच्याविरोधात महापालिका निवडणूक लढविण्याचे मोठे आव्हान ठाकरे, तसेच शरद पवार यांच्या पक्षांपुढे आहे. ठाण्यात शिंदे यांच्यासमोर आव्हान उभे करायचे असेल, तर  एकत्र येऊन लोकांपुढे जावे लागेल याची जाणीव महाविकास विकास आघाडीला झाली आहे. त्यामुळेच ठाकरे बंधूंनी काढलेल्या मोर्चाला काँग्रेस, शरद पवार गटाने पाठिंबा दिला. शिंदेंविरोधातील महाविकास आघाडीची एकजूट व त्याला ठाण्यात भाजपची छुपी साथ लाभली, तर शिंदेंचे स्वबळ रोखणे भाजपला शक्य होईल.

पक्षीय बलाबलठाण्यात शिंदेसेनेचे ६४ नगरसेवक आहेत. भाजपचे २३ नगरसेवक असून, उद्धवसेनेकडे तीन, शरद पवार गटाकडे अंदाजे १४ नगरसेवक उरले आहेत. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीचे ३५ नगरसेवक विजयी झाले होते. काँग्रेसचे तीन, तर एमआयएमचे दोन नगरसेवक निवडून आले होते. 

समस्यांचा पाढाठाणेकरांना सध्या पाण्याची समस्या भेडसावत आहे, वाहतूककोंडी, पार्किंग, रस्त्यावरील खड्डे, आदी समस्यांबरोबर महापालिकेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा मागील काही दिवसांपासून पुढे आला आहे. हेच मुद्दे जनतेसमोर घेऊन भाजप, उद्धवसेना आणि मनसे लोकांसमोर जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP aligns with Ajit Pawar to counter Shinde Sena in Thane.

Web Summary : BJP partners with Ajit Pawar's group in Thane to challenge Eknath Shinde's dominance. Alliances form to tackle issues like corruption and traffic, aiming to curb Shinde Sena's independent strength in upcoming elections.
टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाShiv Senaशिवसेना