शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

हि दोस्ती तुटायची नाय; मित्राने आवाज दिला नसता तर आज मी वाचलो नसतो  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 16:22 IST

Bhiwandi Godown Building Collapse : भिवंडीतील गोदाम इमारत दुर्घटना 

ठळक मुद्देअखिल भडाना ( वय २४ वर्ष रा.कामतघर - मूळ राहणार हरियाणा ) असे मित्राच्या हाकेने वाचलेल्या कामगाराचे नाव असून तो दुर्घटनाग्रस्त गोदाम इमारतीच्या तळ मजल्यावर असलेल्या शॅडोफॅक्स ऑनलाइन पार्सल कुरियर कंपनीत स्कॅनिंगचे काम करतो.

नितिन पंडीतभिवंडी - सख्या नातेसंबंधांपेक्षा सध्या मित्राच्या नात्याला जास्त महत्व तरुणाईकडून देण्यात येत आहे. मित्रा तुझ्यासाठी काय पण म्हणत मित्रासाठी काहीही करण्याच्या तयारी तरुण मित्रांची असते. याच मैत्रीच्या जीवावर एका मित्राचा जीव वाचल्याची घटना भिवंडीतील इमारत दुर्घटने प्रसंगी घडली आहे. कामावर यायला उशीर झाला होता, मात्र गाडी पार्क करून कंपनीत जाणार तोच बाजूला उभा असलेल्या मित्राने आवाज दिला. मित्राने आवाज दिला म्हणून त्याला भेटण्यासाठी अवघी पाच ते दहा सेकंड गेले आणि इमारत कोसळली . मित्राने आवाज दिला नसता तर आज मी वाचलो नसतो अशी भावना या दुर्घटनेत बचावलेल्या कामगाराने व्यक्त केली. दरम्यान दुर्घटनेत कामगाराच्या दुचाकीचा दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. 

भिवंडीत गोदाम इमारत कोसळली; १ मृत्यू तर ६ जखमी, ढिगाऱ्याखाली ४-५ जण अडकल्याची शक्यता

अखिल भडाना ( वय २४ वर्ष रा.कामतघर - मूळ राहणार हरियाणा ) असे मित्राच्या हाकेने वाचलेल्या कामगाराचे नाव असून तो दुर्घटनाग्रस्त गोदाम इमारतीच्या तळ मजल्यावर असलेल्या शॅडोफॅक्स ऑनलाइन पार्सल कुरियर कंपनीत स्कॅनिंगचे काम करतो. सोमवरी त्याला कामावर यायला उशीर झाला होता , घाई घाईत त्याने कंपनी जवळ दुचाकी गाडी पार्क केली आणि कंपनीत जाणार तोच त्याचा मित्र आशिष याने आवाज दिला. गाडी वरून उतरलो आणि आशिषकडे जाण्यासाठी अवघ्या पाच दहा पावले मागे आलो तोच इमारत कोसळली. मात्र या इमारत दुर्घटनेत माझ्या गाडीचे मोठे नुकसान झाले. मात्र सुदैवाने माझा जीव वाचला , मित्राने आवाज दिला नासता तर आज मी इथे नसतो, देवाच्या रूपाने मित्रानेच मला वाचवले अशी भावनिक प्रतिक्रिया अखिल भडाना याने दिली आहे. दरम्यान या दुर्घटनेत एकाचा मृत्यू तर सहा जण जखमी झाले असून जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

टॅग्स :bhiwandiभिवंडीBuilding Collapseइमारत दुर्घटना