किरकोळ कारणावरून फ्रीस्टाइल हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:30 IST2021-07-17T04:30:06+5:302021-07-17T04:30:06+5:30

डोंबिवली : येथील पूर्वेकडील देसलेपाडा परिसरातील साई एन्क्लेव्ह या सोसायटीतील काही रहिवाशांमध्ये बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास फ्रीस्टाइल ...

Freestyle fights for petty reasons | किरकोळ कारणावरून फ्रीस्टाइल हाणामारी

किरकोळ कारणावरून फ्रीस्टाइल हाणामारी

डोंबिवली : येथील पूर्वेकडील देसलेपाडा परिसरातील साई एन्क्लेव्ह या सोसायटीतील काही रहिवाशांमध्ये बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास फ्रीस्टाइल हाणामारी झाल्याची घटना घडली. हा प्रकार मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारीवरून हाणामारी करणे, गैरकायद्याची मंडळी जमा करणे आणि विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले आहेत.

सोसायटीत राहणाऱ्या एका महिलेकडे असलेल्या कुत्र्याच्या पिलाने एका मजल्यावर घाण केली होती. दुसऱ्या महिलेने या मुद्यावर संबंधित महिलेशी वाद घातला. ज्या महिलेचे कुत्र्याचे पिलू होते तिने साफसफाई केली; परंतु रात्री आठच्या सुमारास पुन्हा वाद वाढला आणि वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. प्रारंभी महिला एकमेकांना भिडल्या असताना पुरुषदेखील त्यात सहभागी झाले. दरम्यान हा फ्रीस्टाइल हाणामारीचा प्रसंग मोबाइलमध्ये कैद झाला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून ही हाणामारी चर्चेचा विषय ठरली आहे. हाणामारी करणाऱ्या १४ ते १५ जणांवर परस्परविरोधी तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले असून यातील चौघांना अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा हरी चौरे यांनी दिली.

------------------------------------------------------

Web Title: Freestyle fights for petty reasons