ठाणे प्लास्टिक मुक्त करा
By Admin | Updated: November 16, 2016 04:22 IST2016-11-16T04:22:16+5:302016-11-16T04:22:16+5:30
उल्हासनगर प्लास्टिक मुक्तचा निर्णय घेऊ शकते. मग ठाणे केव्हा प्लास्टिक मुक्त होणार असा प्रश्न उपस्थित करीत ठाणे रेल्वे प्रवासी

ठाणे प्लास्टिक मुक्त करा
ठाणे : उल्हासनगर प्लास्टिक मुक्तचा निर्णय घेऊ शकते. मग ठाणे केव्हा प्लास्टिक मुक्त होणार असा प्रश्न उपस्थित करीत ठाणे रेल्वे प्रवासी संघाने महापालिका आयुक्त आणि ठाण्याचे महापौरांना निवेदन देत, ‘प्लास्टिक मुक्त ठाणे’ करण्याची मागणी केली आहे.
प्रवासी संघाने दिलेल्या निवेदनात, प्लास्टिक मुक्त करण्यास ठाण्यातील सर्वच पक्षांचे राज्यकर्ते आणि ठाणे महापालिका प्रशासन उदासीन का? अशी विचारणा संघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी केली आहे. याच प्लास्टिकमुळे जनावरे दगावत आहेत. गटारे आणि चेंबर्स चोकअप होतात, डेंग्यु यांचा प्रादुर्भाव, रोगराई वाढते. हे सर्व महापालिका लोकप्रतिनिधी दिसत नाही का? असाही प्रश्न त्यांनी केला आहे. (प्रतिनिधी)