मुंब्य्रातील रस्ता फेरीवाला मुक्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:42 IST2021-03-17T04:42:11+5:302021-03-17T04:42:11+5:30

मुंब्रा : येथील मुख्य रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांवर सक्त कारवाई करून रस्ते फेरीवाले मुक्त करण्याचे आदेश गृहनिर्माण मंत्री जितेंद्र ...

Free the street vendor in Mumbai | मुंब्य्रातील रस्ता फेरीवाला मुक्त करा

मुंब्य्रातील रस्ता फेरीवाला मुक्त करा

मुंब्रा : येथील मुख्य रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांवर सक्त कारवाई करून रस्ते फेरीवाले मुक्त करण्याचे आदेश गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना सोमवारी दिले. काही वर्षांपूर्वी येथील गुलाब पार्क बाजारपेठेतील फेरीवाल्यांना मित्तल मैदानात स्थलांतरित केले होते. परंतु, मागील काही दिवसांपासून येथील मुख्य रस्त्यांवर त्यांनी बस्तान बसवण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये नवीन फेरीवाल्यांची संख्या जास्त आहे. यामुळे मित्तल मैदानामध्ये स्थलांतरित झालेले जुने फेरीवाले आणि सध्या मुख्य रस्त्यावर व्यवसाय करणारे नवीन फेरीवाले यांच्यात संघर्ष उफाळण्याची शक्यता निर्माण झाली होती. तसेच रस्ता रुंदीकरणानंतरही येथील वाहतूककोंडी मात्र जैसे थे आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत आव्हाड यांनी हे आदेश दिले. तसेच कारवाई करण्यात येणाऱ्या फेरीवाल्यांना मित्तल मैदानातील बाजारपेठेत स्थलांतरित करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

Web Title: Free the street vendor in Mumbai