शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
2
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
3
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
4
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
5
T20 World Cup 2024: सुपर आठमध्ये अनपेक्षित निकाल शक्य
6
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा
7
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
8
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
9
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
10
'नीट' रद्द करून गैरप्रकारांची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी
11
भारत G7 परिषदेचा सदस्य नाही, तरीही PM मोदी केंद्रस्थानी! जागतिक पटलावर काय आहे अर्थ?
12
पाऊस पडावा म्हणून लोकांचं अजब कृत्य; लावले दोन बेडकांचे लग्न!
13
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
14
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
15
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
16
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
17
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
18
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
19
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
20
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!

बारावे घनकचरा प्रकल्पाचा मार्ग मोकळा, हरित लवादाने उठवली स्थगिती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2018 5:50 AM

हरित लवादाने उठवली स्थगिती : पोलीस बंदोबस्तात काम सुरू

कल्याण : केडीएमसीच्या बारावे घनकचरा प्रकल्पास राष्ट्रीय हरित लवादाने ‘जैसे थे’चे आदेश दिले होते. मात्र, हे आदेश लवादाने शिथिल केले आहेत. त्यामुळे प्रकल्पाच्या कामाला गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बारावे येथे तीन हेक्टर जागेवर कचऱ्यापासून खत आणि भरावभूमी क्षेत्र प्रकल्प उभारण्यासाठी २०१६ मध्ये निविदा महापालिकेने काढली होती. सौराष्ट्र कंपनीची १६ कोटींची निविदा मंजूर होताच कार्यादेश दिला गेला.

२०१७ मध्ये पर्यावरण विभागाकडून नाहरकत दाखला मिळवण्यासाठी महापालिका प्रयत्नशील होती. ६ जूनला हा दाखला मिळाला. मात्र, बारावे येथील एका नागरिकाने हरित लवादाकडे दाद मागितली. त्यामुळे लवादाने महापालिकेस ‘जैसे थे’चे आदेश दिले होते. यासंदर्भात दोन सुनावण्या झाल्यानंतर ‘जैसे थे’चे आदेश शिथिल केल्याची माहिती महापालिकेच्या घनकचरा विभागाने दिली आहे. परंतु, या निर्णयाविरोधात याचिकाकर्त्यास चार आठवड्यांत पर्यावरण विभागाकडे दाद मागता येईल, अशी मुभा लवादाने दिली आहे. मात्र, स्थगिती हटल्याने आता सौराष्ट्र कंपनीला काम सुरू करता येणार आहे.दुसरीकडे महापालिकेने गोदरेज कंपनीच्या नऊ कोटी रुपयांच्या सीएसआर फंडातून कचºयापासून सीएनजी गॅस प्रकल्प आणि प्लास्टिक रॅपरपासून तेल तयार करण्याचे प्रकल्प उभारले आहेत. सध्या तेलाच्या प्रकल्पाचा रिअ‍ॅक्टर बसवण्याचे काम सुरू आहे. रिअ‍ॅक्टरची किंमत एक कोटी आठ लाख रुपये आहे. याशिवाय, काही कचरा जाळून त्याच्या राखेपासून विटा तयार केल्या जाणार आहेत. त्याचबरोबर प्लास्टिक कचºयावर पुनर्प्रक्रिया करून त्याचे दाणे तयार केले जाणार आहेत.कंपनी हे सर्व प्रकल्प १० वर्षे चालवणार आहे. ओल्या, सुक्या कचºयाचे वर्गीकरण करण्याचीही तयारी कंपनीने दाखवली आहे. स्थानिकांनी दोन महिन्यांपूर्वी प्रकल्पाला विरोध करत त्याचे काम बंद पाडले होते. आता ते पोलीस बंदोबस्तात पुन्हा सुरू झाले आहे. गोदरेजचा प्रकल्प प्रत्यक्षात कार्यान्वित होऊन सुरू होण्यासाठी आणखी एक महिना लागू शकतो, अशी माहिती घनकचरा विभागाचे अभियंता मिलिंद गायकवाड यांनी दिली.कामालागती द्याउंबर्डे, बारावे आणि आधारवाडी येथील घनकचरा प्रकल्पांच्या कामाची पाहणी गुरुवारी शिवसेनेचे नगरसेवक विश्वनाथ राणे यांनी केली. उंबर्डे व बारावे प्रकल्पांतील अडथळा दूर झाला आहे. त्यामुळे प्रकल्पांच्या कामाला गती द्या, अशा सूचना राणे यांनी घनकचरा विभागाच्या अधिकारीवर्गास दिल्या आहेत.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाthaneठाणे