१४ लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:38 IST2021-03-06T04:38:14+5:302021-03-06T04:38:14+5:30

----------------------------------- दुचाकीची चोरी डोंबिवली : राहुल भारद्वाज यांनी त्यांची दुचाकी पूर्वेकडील कचोरे परिसरातील गुरुकृपा चाळीच्या परिसरात २७ फेब्रुवारीच्या मध्यरात्री ...

Fraud of Rs 14 lakh | १४ लाखांची फसवणूक

१४ लाखांची फसवणूक

-----------------------------------

दुचाकीची चोरी

डोंबिवली : राहुल भारद्वाज यांनी त्यांची दुचाकी पूर्वेकडील कचोरे परिसरातील गुरुकृपा चाळीच्या परिसरात २७ फेब्रुवारीच्या मध्यरात्री पार्क केली होती. तेथून ती चोरीला गेली असून, या प्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

----------------------------------------

एमआरटीपी गुन्हा

कल्याण : केडीएमसीची परवानगी न घेता तळमजला अधिक पाच मजल्यांचे बांधकाम केल्याच्या आरोपाखाली भूषण भोईर यांच्याविरोधात एमआरटीपीचा गुन्हा विष्णुनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. ह प्रभागक्षेत्र अधिकारी भारत पवार यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. हे बांधकाम ऑगस्ट २०१७ पूर्वी पश्चिमेकडील ठाकूरवाडी परिसरात केले आहे.

------------------------------------------

सिटी स्कॅन केंद्रात चोरी

डोंबिवली : येथील पूर्वेकडील टिळकरोड ब्राम्हण सभा हॉलच्या शेजारी असलेल्या ओम स्कॅन सिटी एमआरआय केंद्रातील लोखंडी तिजोरीचे लॉक तोडून चोरट्यांनी ७४ हजारांची रोकड लंपास केल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी केंद्राचे व्यवस्थापक सुनील मोकाशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

-----------------------------------------------

Web Title: Fraud of Rs 14 lakh