उल्हासनगरात ५४ लाख ५६ हजाराची फसवणूक; ५ जणांवर गुन्हा दाखल
By सदानंद नाईक | Updated: April 7, 2023 18:37 IST2023-04-07T18:37:09+5:302023-04-07T18:37:48+5:30
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर, हासानंद कारीरा यांनी ५ जणा विरोधात उल्हासनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली

उल्हासनगरात ५४ लाख ५६ हजाराची फसवणूक; ५ जणांवर गुन्हा दाखल
सदानंद नाईक
उल्हासनगर : कॅम्प नं-२ शिरू चौक येथे राहणाऱ्या हासानंद कारीरा यांच्याकडून ५४ लाख ५६ हजार ९१० रुपये देऊनही २० टन वजना पैकी १८.५ टन कृष्णाई स्कीम्ड मिल्क पावडरचा पुरवठा न करता फसवणूक केली. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात ५ जणा विरोधात गुन्हा दाखल केला.
उल्हासनगर मध्ये राहणारे व्यापारी हासानंद कारीरा यांना चित्तरंजन झा, राजेश सिंग, प्रकाश वाणी, विपीनकुमार चौधरी व शिल्पा सुराणा या पाच जणांनी विश्वासात घेऊन जुलै ते डिसेंबर २०२२ दरम्यान कृष्णाई स्कीम्ड मिल्क पावडर खरेदी करण्यास उदयुक्त केले. २० टन पावडर खरेदी करण्यासाठी हासानंद कारीरा यांनी बँक ऑफ बडोदा बँकेतून ५९ लाख १६ हजार ३९६ रुपये ब्लीज डेअरी फ्रेश कंपनीच्या खात्यात आगाऊ पाठविले. मात्र त्यांनी २० टन ऐवजी फक्त १.५ टन एवढीच पावडर पाठविली. ५४ लाख ५६ हजार ९१० रुपयांची १८.५ टन पावडर पाठविली नसून फसवणूक केली.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर, हासानंद कारीरा यांनी ५ जणा विरोधात उल्हासनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून ५ जणा विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.