उल्हासनगरात जागेची बनावट सनद देऊन १९ लाख ५० हजाराने फसवणूक
By सदानंद नाईक | Updated: July 7, 2023 16:34 IST2023-07-07T16:34:24+5:302023-07-07T16:34:28+5:30
पोलिसांनी अमित कामरा (मुखी) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

उल्हासनगरात जागेची बनावट सनद देऊन १९ लाख ५० हजाराने फसवणूक
उल्हासनगर : जागेची सनद प्राप्त करून बांधकामाचा सर्व परवाने मिळून देण्याचे आमिष दाखवून राजेश बजाज यांच्याकडून १९ लाख ५० हजार उखळले. मात्र दिलेली सनद बनावट असल्याचे उघड झाल्यावर, अमित अशोकलाला कामरा (मुखी) याच्या विरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
उल्हासनगरात जागेच्या सनदचा म्हणजे मालकी हक्काचा प्रश्न अध्यापही शहरात गाजत आहे. राजेश हिरानंद बजाज यांना त्यांच्या जागेची सनद (मालकी हक्क) मिळून देण्यासाठी तसेच बांधकाम परवाने काढून देण्याचे आमित अमित अशोकलाल कामरा (मुखी)दिले. त्यासाठी टप्प्याटप्प्याने १९ लाख ५० रुपये उखळले. दरम्यान दिलेली सनद बनावट असल्याचे उघड झाल्यावर आपली फसवणूक झाल्याने, राजेश बजाज यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी अमित कामरा (मुखी) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.