शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेचे जॉयनिंग लेटर देत १० लाखांची फसवणूक, उल्हासनगरच्या महिलेविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 11:28 IST

Crime News: रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दहा लाख रुपये घेऊन बनावट जॉयनिंग लेटर आणि ओळखपत्रे देऊन फसवणूक केल्याप्रकरणी प्रियांका ऊर्फ पिंकी जाधव (राहणार संभाजी चौक, लालचक्की स्टेशन रोड, उल्हासनगर) हिच्याविरोधात कामोठे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचे बुधवारी पोलिसांनी सांगितले.

नवीन पनवेल - रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दहा लाख रुपये घेऊन बनावट जॉयनिंग लेटर आणि ओळखपत्रे देऊन फसवणूक केल्याप्रकरणी प्रियांका ऊर्फ पिंकी जाधव (राहणार संभाजी चौक, लालचक्की स्टेशन रोड, उल्हासनगर) हिच्याविरोधात कामोठे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचे बुधवारी पोलिसांनी सांगितले. विशेष म्हणजे या प्रकरणात सेंट जॉर्जेस हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय चाचणी केल्याने यात मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

अमेय अनिल घाग हे सेक्टर २१, जुईनगर येथे राहतात. ते सरकारी नोकरीच्या शोधात होते. त्यांना पिंकी ऊर्फ प्रियंका मनोहर जाधव हिचे रेल्वेतील अधिकाऱ्यांंशी ओळख असून, अनेक लोकांना नोकरीस लावले आहे असे समजले. यानंतर पिंकीने रेल्वेत क्लार्कची नोकरी लावते यासाठी दहा लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगून त्यांच्याकडून कागदपत्र घेतले. यानंतर त्यांनी पैसे ट्रान्सफर केले. त्यानंतर ऑगस्ट २०२२ मध्ये व्हॉट्सॲपवर रेल्वेचे लेटरहेड त्यावर रिपोर्टिंग लेटर पाठवले. यावेळी रेल्वेत नोकरी लागणार असल्याची खात्री झाली. त्यामुळे त्यांनी उरलेले पैसे पाठवले. 

सेंट जॉर्जेसमध्ये  वैद्यकीय चाचणीऑफर लेट दिल्यानंतर संबंधिताची  सेंट जॉर्जेस हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय चाचणी करण्यात आली. काही दिवसांनी पिंकी यांनी रेल्वे विभागाचे ओळखपत्र, कमर्शियल क्लार्क लिहिलेले व सही शिक्का असलेले ओळखपत्र दिले. ऑगस्ट २०२३ मध्ये अमेय लोकलने जात असताना कोपरखैरणे येथे टीसीने त्यांना अडवून तिकिटाबाबत विचारणा केली. त्यावेळी रेल्वेचे ओळखपत्र दाखवले. ते बनावट असल्याचे सांगून टीसीने दंड आकारला आणि वाशी लोहमार्ग पोलिसांनी या प्रकरणी जबाब नोंदवला. यावेळी वारंवार संपर्क साधूनही प्रतिसाद न दिल्याने अखेर प्रियंका ऊर्फ पिंकी जाधव हिने नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याबाबत त्यांनी २९ जानेवारी रोजी पोलिसांत गुन्हा नोंदविला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी