बनावट सह्या करून फसवणूक
By Admin | Updated: May 8, 2017 06:04 IST2017-05-08T06:04:21+5:302017-05-08T06:04:21+5:30
ठाणे जिल्हा शल्यचिकित्सकांपाठोपाठ ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून फसवणुकीचा

बनावट सह्या करून फसवणूक
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे जिल्हा शल्यचिकित्सकांपाठोपाठ ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून फसवणुकीचा प्रयत्न केल्याचा प्रकार ठाण्यात समोर आला आहे. वस्तुत: २०१४ मध्ये ही घटना घडली होती. हा प्रकार उपसंचालक कार्यालयाच्या निदर्शनास आल्यावर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील अनोळखी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती ठाणेनगर पोलिसांनी दिली.
जिल्हा परिषदेचे मुक्तेश्वर छडीदार या दिलेल्या तक्रारीत, जिल्हा परिषदेच्या शाळांमधील चार शाळांची प्रथम मान्यता व स्थलांतर प्रस्ताव मंजूर करण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करून उपसंचालकांच्या नावे बनावट पत्र तयार केले आणि त्यातून शिक्षण उपसंचालक कार्यालयाची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.