साडेसोळा लाखांचा कौल निर्णायक
By Admin | Updated: October 10, 2014 01:49 IST2014-10-10T01:49:16+5:302014-10-10T01:49:16+5:30
१५ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या राज्य विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पालघर जिल्हयातील ६ मतदारसंघात सुमारे १६ लाख ६१ हजार १२२ मतदार आपल्या मताचा अधिकार वापरणार

साडेसोळा लाखांचा कौल निर्णायक
दिपक मोहिते, वसई
१५ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या राज्य विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पालघर जिल्हयातील ६ मतदारसंघात सुमारे १६ लाख ६१ हजार १२२ मतदार आपल्या मताचा अधिकार वापरणार आहेत. यापैकी ८ लाख ७३ हजार ८३० पुरूष व ७ लाख ८७ हजार २०६ महिला मतदार आहेत. तर इतर मतदारांची संख्या ८६ इतकी आहे. सदर निवडणुक शांततेत पार पडावी याकरीता निवडणुक यंत्रणेने जय्यत तयारी केली आहे.
यंदाच्या राज्य विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मतदार नालासोपारा येथे आहेत. या मतदारसंघात एकुण ३ लाख ९६ हजार १९१ मतदार आहेत. त्यापैकी २ लाख १८ हजार १८५ पुरूष तर महिला मतदारांची संख्या १ लाख ७७ हजार ९६२ इतकी आहे. या मतदारसंघात इतर मतदारांची संख्याही अन्य मतदारसंघातील मतदारांपेक्षा सर्वाधिक आहे. येथे ४४ इतर मतदार मतदान करतील. वसई येथे एकुण मतदार २ लाख ९० हजार ९१४ इतकी आहे. त्यापैकी १ लाख ५० हजार ६११ पुरूष तर १ लाख ४० हजार ३०१ महिला व इतर २ मतदार आहेत. पालघर येथे २ लाख ४१ हजार ४४ मतदार असून १ लाख २३ हजार ९९४ पुरूष व १ लाख १७ हजार ४३ महिला मतदार आहेत. येथे इतर मतदारांची संख्या ७ इतकी आहे. डहाणू येथे एकुण २ लाख ३४ हजार १६२ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील. त्यापैकी १ लाख १८ हजार ८९१ तर १ लाख १५ हजार २६७ मतदार आहेत. इतर मतदारांची संख्या ४ इतकी आहे. विक्रमगड येथे २ लाख ४६ हजार ४३१ मतदार असून १ लाख २५ हजार ७१० पुरूष तर १ लाख २० हजार ७२१ मतदार महिला आहेत. येथे एकही मतदार इतर नाहीत. बोईसर मतदारसंघात २ लाख ५२ हजार ३८० मतदार असून १ लाख ३६ हजार ४३९ पुरूष तर १ लाख ५० हजार ९१२ महिला मतदार आपला हक्क बजावतील. येथे एकुण २९ इतर मतदार आहेत.
६ मतदार संघापैकी बोईसर, पालघर, डहाणू, विक्रमगड हे ४ मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहेत. तर वसई व नालासोपारा हे २ मतदारसंघ सर्वसाधारण गटासाठी खुले आहेत. या सहाही मतदारसंघात विविध राजकीय पक्षामध्ये ५८ उमेदवार आपले नशिब आजमावीत आहेत. १२८ विक्रमगड - १२, १२९ डहाणू - १२, १३० पालघर - ८, १३१ बोईसर - १०, १३२ नालासोपारा - ८, १३३ वसई - ८ असे प्रत्येक मतदारसंघात उमेदवार आपले नशीब आजमावीत आहेत. १५ आॅक्टोबरला चित्र स्पष्ट होणार आहे.