चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू

By Admin | Updated: October 11, 2016 02:37 IST2016-10-11T02:37:02+5:302016-10-11T02:37:02+5:30

सहाव्या मजल्यावरील स्वयंपाकघराच्या गॅलरीत खेळताना तोल जाऊन पडल्याने चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी

Four year old child dies | चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू

चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू

बदलापूर : सहाव्या मजल्यावरील स्वयंपाकघराच्या गॅलरीत खेळताना तोल जाऊन पडल्याने चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी ८ च्या सुमारास ही घटना घडली. बदलापूर पूर्वेकडील कात्रप परिसरात सत्यम प्लाझा या इमारतीत राहणारा शिवाशी यादव (४) हा स्वयंपाकघराच्या गॅलरीत खेळत होता. त्याचा तोल गेल्याने तो सहाव्या मजल्यावरून खाली पडला. त्याच्या डोक्याला मार लागला.
तत्काळ येथील खाजगी रु ग्णालयात दाखल केले. तेथून
बदलापूर ग्रामीण रु ग्णालयात नेले. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. (वार्ताहर)

Web Title: Four year old child dies