शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

चार रात्री फक्त पाणी अन् काळोख, मलेशियात अपहरण झालेल्या वैद्यबंधूंनी सांगितली आपबीती  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2018 02:58 IST

‘व्यवसायानिमित्त मलेशियात गेलो असताना अपहरणकर्त्यांनी आमचे अपहरण करत आम्हाला एका बंद खोलीत डांबून ठेवले. डोळ्यांना व हातापायांना त्यांनी पट्टी बांधली होती. त्यांना आठवण आली तरच...

डोंबिवली : ‘व्यवसायानिमित्त मलेशियात गेलो असताना अपहरणकर्त्यांनी आमचे अपहरण करत आम्हाला एका बंद खोलीत डांबून ठेवले. डोळ्यांना व हातापायांना त्यांनी पट्टी बांधली होती. त्यांना आठवण आली तरच ते आम्हाला जेवायला देत होते, अशा बिकट अवस्थेत आम्ही चार रात्री अपहरणकर्त्यांच्या तावडीत होतो. आमची सहीसलामत सुटका होईल, असे आम्हाला वाटले नव्हते; पण आज कुटुंबीयांसोबत असल्याने आम्ही खूश आहोत’ अशा शब्दांत वैद्यबंधूंनी तेथील प्रकार कथन केला.मलेशियामध्ये अपहरण झालेले वैद्यबंधू शुक्रवारी डोंबिवलीतील घरी परतले. त्यानंतर, शनिवारी त्यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. ‘रॉक फ्रोझन फूड’ नावाने फ्रोझन फिशविक्रीचा व्यवसाय कौस्तुभ आणि रोहन वैद्य करतात. या व्यवसायानिमित्त रोहन नेहमी परदेशात जातो. मलेशियातील मीस ली फ्रोझन फूड कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत व्यावसायिक चर्चेसाठी रोहन मलेशियामध्ये जाणार होता. याचदरम्यान, लॅक-किन मरिन कंपनीच्या एका माणसाने त्यांना फोन करून व्यवसायाबाबत त्यांच्याकडे विचारणा केली, तसेच व्यवसाय करायचा असल्याचे त्यांना सांगितले. त्यावर, मलेशियात आल्यावर भेटून सविस्तर चर्चा करू, असे रोहन आणि कौस्तुभ यांनी त्यांना सांगितले.२ आॅगस्टला मलेशियातील मीस ली फ्रोझन फूड कंपनीच्या अधिकाºयांसोबत वैद्यबंधूंची व्यावसायिक चर्चा संपली. त्यानंतर, ते लॅक-किन मरिन कंपनी चालवणाºया अली नावाच्या व्यक्तीला भेटणार होते. या कंपनीच्या माणसाने वैद्यबंधंूना घेण्यासाठी हॉटेलमध्ये एक मोटार पाठवली; परंतु तेथे जात असताना रस्त्यातच एके ठिकाणी अन्य मोटारीतून आलेल्या अपहरणकर्त्यांनी त्यांना मारहाण करत त्यांच्याजवळील पाकीट, सोन्याचे दागिने तसेच मोबाइल काढून घेतले. त्यांचे हातपाय, डोळे पट्टीने बांधले. त्यामुळे नेमके कुठे नेले, हे वैद्यबंधंूना कळले नाही. चार दिवस या दोघांना कोंडून ठेवले होते.अपहरणकर्ते हे आपापसात तामीळमध्ये बोलत होते, तर आमच्याशी इंग्रजीत संभाषण करत होते. अपहरणकर्त्यांनी आमच्याकडे एक कोटीची मागणी केली; परंतु पैसे न दिल्यास कौस्तुभला मारण्याची धमकीही त्यांनी दिली. काळोख असल्याने त्यांच्याकडे नेमकी कोणती शस्त्रे होती, हे आम्हाला समजू शकले नाही, असे त्यांनी सांगितले. अपहरणकर्त्यांनी परत मलेशियासह इतर तीन देशांत पुन्हा यायचे नाही, अशी धमकी देऊन आम्हाला सोडून दिले, असे वैद्यबंधू म्हणाले. या प्रकरणी पुढील तपास मलेशिया पोलीस तसेच ठाणे पोलीस करत आहेत.भारतीय टॅक्सीचालकाने सोडलेअपहरणकर्त्यांनी या दोघांकडील मोबाइल, पाकीट, सोन्याच्या वस्तू घेतल्या होत्या. चार रात्री आणि पाच दिवसांनंतर रात्री ११ च्या सुमारास सिंगापूरच्या दिशेला असलेल्या जोहरबारू रोड महामार्गावर अपहरणकर्त्यांनी वैद्यबंधूंना सोडले. तेथे त्यांनी एका टॅक्सीला हात दाखवला. टॅक्सीचालकाला वैद्यबंधूंनी आपल्यावर ओढवलेला प्रसंग कथन केला. तो भारतीय होता. त्याने दोघांना त्यांचे वास्तव्य असलेल्या ग्रॅण्ड आर्चेड हॉटेलवर आणून सोडले. यानंतर, मलेशियन पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली.रोहन हा व्यवसायाच्या निमित्ताने नेहमी मलेशियात ये-जा करत होता; परंतु लॅक-किन मरिन ही नवीन कंपनी आपल्यासोबत व्यवसाय करण्यास उत्सुक असल्याने कौस्तुभ पहिल्यांदा मलेशियात रोहनसोबत गेला.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीCrimeगुन्हाnewsबातम्या