शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातून चोरी झालेल्या चार मोबाईलची परराज्यात विक्री: पोलिसांनी लावला छडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 22:00 IST

गेल्या सहा महिन्यामध्ये वर्तकनगर भागातून चोरीस गेलेल्या सात मोबाईलचा शोध घेण्यात यश आले असून त्यातील एक मोबाईल तामिळनाडूतील पोलिसाच्या भावाकडून हस्तगत करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे मुळ मालकांना केले परतपोलीस शिपायाच्या भावाला केले जेरबंदवर्तकनगर पोलिसांची कामगिरी

ठाणे : वर्तकनगर भागातून चोरीस गेलेल्या सात वेगवेगळ्या मोबाइलचा छडा लावण्यात ठाणे पोलिसांना यश आले असून त्यातील चार मोबाइल हे परराज्यातून हस्तगत केले आहेत. यातील एक मोबाइल वर्तकनगर पोलिसांनी तक्रारदाराकडे सुपूर्द केला आहे. तामिळनाडूच्या विशेष कृती दलातील पोलीस शिपायाचा भाऊ लक्ष्मण बालाजी (३३) याला अटक केली आहे.वर्तकनगर येथील एका सहकारी बँकेच्या व्यवस्थापिका मृदुल करंदीकर (५१) यांचा २५ हजारांचा मोबाइल ३ जानेवारी २०१७ रोजी चोरीस गेला होता. काही तांत्रिक माहितीच्या आधारे हा मोबाइल तामिळनाडूतील पोलिसाच्या भावाकडे असल्याची माहिती वर्तकनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांना मिळाली. याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप गिरधर यांच्या मार्गदशनाखाली गायकवाड तसेच पोलीस नाईक संदीप ठाणगे, भूषण गायकवाड आदींच्या पथकाने थेट तामिळनाडूतील कृष्णगिरी जिल्ह्यात जाऊन २४ डिसेंबर २०१७ रोजी लक्ष्मण याच्याकडून मोबाइल हस्तगत केला. त्याला हा मोबाइल एका चोरट्याने अत्यल्प किमतीत विकल्याची कबुली त्याने दिली. एका पोलिसाचा हा नातेवाईक असल्यामुळे त्याचा ताबा मिळवण्यात ठाणे पोलिसांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. मात्र, तामिळनाडू न्यायालयाने बालाजीचा ताबा ठाणे पोलिसांना दिला.अन्य एका प्रकरणात अक्षय शिंदे (रा. डिसूझावाडी, शिवाजीनगर, ठाणे) यांचा १६ आॅक्टोबर २०१७ रोजी ठाण्यातील विवियाना मॉलमधून ३० हजारांचा मोबाइल गहाळ झाला होता. तो मुंबईच्या धारावीतील सुमंतो रॉय यांना एका चोरट्याने अवघ्या आठ हजारांमध्ये विकला होता. रॉय यांच्याकडून हा मोबाइल हस्तगत केला असून तो ५ फेब्रुवारी रोजी निरीक्षक गिरधर यांच्या हस्ते अक्षय यांना सुपूर्द करण्यात आला.याशिवाय, ज्ञानेश्वर माने (रा. ढवलेनगर) यांचा ३ जुलै २०१७ रोजी लोकमान्यनगर बस डेपो येथून गहाळ झालेला १५ हजारांचा मोबाइल राजस्थानातील भूपेंद्रसिंग कोसवाल यांच्याकडे असल्याची माहिती मिळाली. त्यांना एका भामट्याने पाच हजारांमध्ये तो विकला होता. त्यांच्याकडून तो कुरिअरद्वारे पोलिसांनी मागवला. वर्तकनगर पोलीस ठाण्यातील नाईक नारायण घाणेकर यांचाही नऊ हजारांचा मोबाइल आॅक्टोबर २०१७ मध्ये गहाळ झाला होता. तो इंदूर (मध्य प्रदेश) येथील अकील शेख याच्याकडून हस्तगत करण्यात आला. असे सात मोबाइल हस्तगत केल्याची माहिती गिरधर यांनी ‘लोकमत’ला दिली.

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाtheftचोरी