ठाणे : शहरात वेगवेगळ्या दोन रोड अपघातांत चौघे जखमी झाले आहेत. एका घटनेत, रिक्षा पलटी होऊन प्रवासी जखमी झाल्याप्रकरणी रिक्षाचालकाला अटक करण्यात आली आहे. दुस-या अपघातात दोन पादचा-यांसह दुचाकीस्वारही जखमी झाला आहे. मात्र, तो जखमी दुचाकीस्वार दुचाकी सोडून पळून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली.राबोडीतील आकाशगंगा सोसायटीत राहणारे राजन चावरे (५९) हे रिक्षाने जात होते. ती रिक्षा राबोडी ट्रॅफिक आॅफिसनजीक झाडाच्या कठड्यास धडकून पलटी झाली. यावेळी चावरे यांच्या पायाला दुखापत झाली असून याप्रकरणी राबोडीतील इलियास रफिक शेख (३१) या चालकाला अटक झाली आहे. हा प्रकार २५ जानेवारी रोजी रात्री घडल्याची माहिती राबोडी पोलिसांनी दिली. दुस-या घटनेत, माजिवडा येथे राहणारे सखाराम पार्टे (५५) आणि त्यांचा मित्र संतोष म्हसे (४०) हे रेवाळी तलाव येथून माघी गणपती विसर्जन बघून परत पायी घरी जात होते. दरम्यान, ते दोघे बाळकुम फायर ब्रिगेडसमोर रस्ता ओलांडताना, भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांना धडक दिली. यामध्ये त्या दोघांसह दुचाकीस्वार जखमी झाला. तसेच तो जखमी दुचाकीस्वार अपघातानंतर तेथून पळून गेला. याप्रकरणी त्या अनोळखी दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. हा अपघात २५ जानेवारीला रात्री घडला असल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी दिली. याप्रकरणी पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक ए.टी. वाघ करत आहेत............................................
ठाण्यात दोन अपघातांत चौघे जखमी; रिक्षा पलटी करणारा रिक्षाचालक गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 20:00 IST
ठाणे : शहरात वेगवेगळ्या दोन रोड अपघातांत चौघे जखमी झाले आहेत. एका घटनेत, रिक्षा पलटी होऊन प्रवासी जखमी झाल्याप्रकरणी रिक्षाचालकाला अटक करण्यात आली आहे. दुस-या अपघातात दोन पादचा-यांसह दुचाकीस्वारही जखमी झाला आहे. मात्र, तो जखमी दुचाकीस्वार दुचाकी सोडून पळून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली.राबोडीतील आकाशगंगा सोसायटीत राहणारे राजन चावरे (५९) हे ...
ठाण्यात दोन अपघातांत चौघे जखमी; रिक्षा पलटी करणारा रिक्षाचालक गजाआड
ठळक मुद्देझाडाच्या कठड्यास धडकून पलटी जखमी दुचाकीस्वार दुचाकी सोडून फरार