बापरे! दुचाकीवर चौघे आले आणि थेट फटाक्यांच्या माळेवरच पडले
By पंकज पाटील | Updated: October 27, 2022 19:10 IST2022-10-27T19:09:57+5:302022-10-27T19:10:54+5:30
फटाक्यांची माळ लागलेली पाहून या तरुणांनी ब्रेक मारण्याचा प्रयत्न केला, मात्र ब्रेक काही लागले नाहीत आणि हे तरुण थेट या माळेवरच येऊन पडले.

बापरे! दुचाकीवर चौघे आले आणि थेट फटाक्यांच्या माळेवरच पडले
अंबरनाथ - रस्त्यात फटाक्यांची माळ लावलेली असताना अचानक दुचाकीवरून चौघे आले आणि गाडीचा वेग आटोक्यात न आणता आल्याने थेट या माळेवरच पडले. अंबरनाथच्या ग्रीन सिटी परिसरात ही घटना घडली. अंबरनाथ पूर्वेतील ग्रीन सिटी परिसरात बुधवारी भाऊबीजेनिमित्त नागरिक रस्त्यावर येऊन फटाके फोडत होते. एका नागरिकाने रस्त्यात फटाक्यांची माळ लावली होती. त्याचवेळी दुसऱ्या बाजूने एका स्कूटरवर चार तरुण बसून भरधाव वेगात पुढे येत होते.
फटाक्यांची माळ लागलेली पाहून या तरुणांनी ब्रेक मारण्याचा प्रयत्न केला, मात्र ब्रेक काही लागले नाहीत आणि हे तरुण थेट या माळेवरच येऊन पडले. त्यानंतर गाडी तिथेच टाकून या चौघांनी बाजूला पळ काढला आणि माळ फुटून झाल्यावर जाऊन आपली गाडी उचलली. या घटनेत रस्त्यावर माळ लावल्याने हा अपघात झाल्याचा सकृतदर्शनी जरी दिसत असले, तरी एकाच स्कूटरवर चार तरुण बसून भरधाव आले, ही बाब देखील व्हिडिओत स्पष्टपणे दिसते. त्यामुळे हे तरुण गाडीवर भरधाव वेगात स्टंटबाजी करत होते आणि ती स्टंटबाजी या चौघांना चांगलीच शेकली, अशीही चर्चा परिसरात सुरू आहे