एकाच दिवशी चार दुचाकी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:38 IST2021-03-25T04:38:30+5:302021-03-25T04:38:30+5:30

-------------------------- ऑनलाईन फसवणूक उल्हासनगर : सी ब्लॉक परिसरात राहणारे मालिका मिश्रा यांचे आरबीएल बँकेत खाते आहे. तीन फेब्रुवारी रोजी ...

Four bikes stolen in one day | एकाच दिवशी चार दुचाकी चोरी

एकाच दिवशी चार दुचाकी चोरी

--------------------------

ऑनलाईन फसवणूक

उल्हासनगर : सी ब्लॉक परिसरात राहणारे मालिका मिश्रा यांचे आरबीएल बँकेत खाते आहे. तीन फेब्रुवारी रोजी सायंकाळी त्यांच्या मोबाईलवर फोन येऊन तुमच्या क्रेडिट कार्डावरील पॉईंट समाप्त होणार असल्याचा मेसेज आला. तुम्ही ऑनलाईन रीडिंग फॉर्म भरून दिला तर कॅशबॅक मिळेल, असे मेसेजमध्ये सुचविले. मिश्रा यांनी फॉर्म भरून ऑनलाईनला पाठविला. काही क्षणात त्यांच्या खात्यातून एक लाख ९९ हजार ७४९ रुपये ऑनलाईनने काढून फसवणूक केली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

-------------------

चाकूने हल्ला

उल्हासनगर : नेवाळी-खोणी हायवे शेजारी इंद्रसेन सिंग यांची पानटपरी असून, पानटपरीचे रंगकाम दिले नसल्याचा प्रल्हाद सहानी याला राग आला. या रागातून शनिवारी रात्री साडेआठ वाजता प्रल्हाद व रिक्षातून आलेल्या तिघांनी सिगारेट मागण्याच्या बहाण्यातून चाकू हल्ला करून जबर मारहाण केली. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, इंद्रसेन मृत्यूशी झुंज देत आहेत.

Web Title: Four bikes stolen in one day