घुसखोरी करून करत होते मोलमजुरीचे काम. चार बांगलादेशींच्या आवळल्या मुसक्या
By प्रशांत माने | Updated: September 15, 2024 17:21 IST2024-09-15T17:21:41+5:302024-09-15T17:21:52+5:30
चौघेही मोलमजुरीचे काम करत होते. चौघांना पिसवली परिसरातून अटक करण्यात आली.

घुसखोरी करून करत होते मोलमजुरीचे काम. चार बांगलादेशींच्या आवळल्या मुसक्या
डोंबिवली: भारतात घुसखोरी करून कल्याण नजीकच्या पिसवली भागात राहणा-या चार बांग्लादेशी नागरिकांच्या इथल्या मानपाडा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या चौघांपैकी दोन महिला आहेत. चौघेही मोलमजुरीचे काम करत होते. चौघांना पिसवली परिसरातून अटक करण्यात आली.
मोहम्मद शाबीर हुसेन (वय ३०), तौसिफ फिराज शेख (वय ५०), लकी नजरूल शेख ( वय ३५) आणि रुक्साना तौसिफ शेख ( वय ४५) अशी अटक आरोपींची नावे आहेत. यातील माेहम्मदला बांग्लादेशातून भारतात येत असताना सिमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी अटक केली होती. काही दिवसांनी तो पुन्हा भारतात आला. याची माहीती जवानांनी डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांना दिली. त्यानुसार गेल्या काही महिन्यापासून पिसवली परिसरात वास्तव्याला असलेल्या मोहम्मद आणि अन्य तिघांना पोलिस निरिक्षक (गुन्हे ) राम चोपडे यांच्या पथकाने सापळा लावून अटक केली. चौघांविरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.