डॉक्टर मारहाण प्रकरणी चौघे अटकेत
By Admin | Updated: March 31, 2017 03:59 IST2017-03-31T03:59:31+5:302017-03-31T03:59:31+5:30
जिल्हा सामान्य रूग्णालयात बुधवारी एका शिकाऊ डॉक्टरला रूग्ण आणि त्याच्या नातेवाइकांनी मारहाण केल्याप्रकरणी ठाणे

डॉक्टर मारहाण प्रकरणी चौघे अटकेत
ठाणे : जिल्हा सामान्य रूग्णालयात बुधवारी एका शिकाऊ डॉक्टरला रूग्ण आणि त्याच्या नातेवाइकांनी मारहाण केल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी चौघांना अटक केली. तर, या मारहाणीचा निषेध नोंदवण्यासाठी डॉक्टरांनी आंदोलन केले. या वेळी डॉक्टर संघटनांच्या मागण्या मान्य करण्याचे लेखी आश्वासन मुंबई मंडळाच्या ठाणे येथील आरोग्य विभागाच्या उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले. ठाणे नगर पोलिसांनी बुधवारी रात्रीच मुजफ्फर मेमन, अरफाज पालटे, ओसामा शेख आणि जिशान सारंग यांना अटक केली. त्यांना न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. (प्रतिनिधी)