चोरीप्रकरणी चार आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:41 IST2021-04-01T04:41:27+5:302021-04-01T04:41:27+5:30

टोकावडे : मुरबाड शहरातील झुंजारराव कॉम्प्लेक्सजवळ भारतीय स्टेट बँकेच्या एटीएममधून २४ मार्च रोजी चोरट्यांनी ४५ लाख रुपये लंपास केल्याची ...

Four accused arrested in theft case | चोरीप्रकरणी चार आरोपींना अटक

चोरीप्रकरणी चार आरोपींना अटक

टोकावडे : मुरबाड शहरातील झुंजारराव कॉम्प्लेक्सजवळ भारतीय स्टेट बँकेच्या एटीएममधून २४ मार्च रोजी चोरट्यांनी ४५ लाख रुपये लंपास केल्याची तक्रार मुरबाड पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. पोलीस निरीक्षक दत्तात्रेय बोराटे यांनी चारच दिवसांत विशेष तपास पथके तयार करून चार आरोपींना अटक केली. ४५ लाखांपैकी ३९ लाख ६९ हजार ७०० रुपये जप्त केले आहेत.

ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, आरोपींनी दोन ते तीन बँकांचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी एसबीआय बँकेचे एटीएम फोडून ४५ लाख रुपये लंपास केल्याची कबुली दिली असून एका आरोपीने त्याच्या कर्जापोटी दोन लाख रुपये बँकेत भरले असून दुसऱ्या आरोपीने एक लाख १० हजार रुपये दुचाकी व कार दुरुस्तीसाठी वापरून खर्च केले, अशी माहिती आरोपी यांनी दिली. याबाबत अधिक तपास सुरू असून उर्वरित रक्कम जप्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे देशमाने यांनी सांगितले.

Web Title: Four accused arrested in theft case