शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपासमोर आणखी एक संकट; सरकार बनवण्यापूर्वीच घटक पक्षांच्या मागणीनं टेन्शन वाढलं
2
जय-पराजय हा राजकारणाचा भाग, आकड्यांचा खेळ सुरूच राहिल; मोदींचे मंत्रिपरिषदेमध्ये 'संकेत'
3
उद्धव ठाकरेंच्या १३ पैकी ७ जागांवर एकनाथ शिंदेंची बाजी; ६ जागा ठाकरेंनी राखल्या
4
“लोकसभा निवडणुकीतील सुमार कामगिरीमुळे फडणवीसांचे राजीनाम्याचे नाटक”; काँग्रेसची टीका
5
केंद्राचे 'डबल इंजिन' पटरीवरुन उतरले; भाजपशासित राज्यातच पक्षाचे सर्वाधिक नुकसान...
6
"हे सरकार जितके दिवस चालेल..."; फडणवीसांनी राजीनाम्याचे संकेत देताच विजय वडेट्टीवारांचा खोचक टोला
7
भाजपात काहीतरी धुमसतेय? मोहित कंबोज यांचे ट्विट, "एका व्यक्तीचं महत्व कमी करण्यासाठी पक्षाचं नुकसान..."
8
देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपद सोडण्याच्या तयारीत, CM शिंदे म्हणाले- "पराभवाची जबाबदारी..."
9
मोठी बातमी! INDIA आघाडीच्या दिल्लीतील बैठकीला उद्धव ठाकरे जाणार नाहीत, काय घडतंय?
10
"फडणवीसांनी दिल्लीची दिशाभूल केली अन् मोदींना तोंडावर पाडलं": पृथ्वीराज चव्हाण
11
T20 World Cup 2024 IND vs IRE Live Match : रोहित शर्माला खुणावतोय MS Dhoniचा मोठा विक्रम, कोहलीही करणार 'विराट' पराक्रम 
12
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का! न्यायालयीन कोठडीत वाढ, अंतरिम जामीन अर्जही फेटाळला
13
Explainer: PM मोदींचा जो नारा कार्यकर्त्यांना 'भावला', तोच भाजपाला 'भोवला'; INDIA ने अचूक डाव साधला
14
Hero Motocorp Share Price : 'या' बाईक कंपनीच्या शेअरनं पकडला तुफान स्पीड, गुंतवणूकदारांच्या उड्या; बनवला रेकॉर्ड
15
किरण सामंतांनी दगाफटका केला? उबाठाच्या अदृश्य हातांची मदत झाली, नितेश राणेंच्या दाव्याने खळबळ
16
सांगलीच्या विजयात काँग्रेसचा गुलाल; ठाकरेंच्या उमेदवाराला कसं पाडलं? सगळं सांगितलं
17
“मी कमी पडलो, महाराष्ट्रातील पराभवाची जबाबदारी स्वीकारतो”: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
Share Market मध्ये बंपर तेजी, Sensex २३०० अंकांनी वधारला; Adani Ports टॉप गेनर
19
सकाळी की रात्री... नेमकं कधी फायदेशीर ठरतं 'चालणं'?; 'या' गोष्टी ठेवा लक्षात
20
"मला सरकारमधून मोकळं करा"; फडणवीसांच्या घोषणेनंतर ठाकरे गट म्हणतो, "आता विनोद तावडे मुख्यमंत्री..."

भाईंदरच्या धारावी किल्ल्यावर मद्यपान-धुम्रपानासह अनैतिक प्रकार होत असल्याचे गडप्रेमींकडून उघडकीस 

By धीरज परब | Published: December 01, 2022 2:30 PM

Dharavi Fort : राज्य मानवी हक्क आयोगाने दखल घेतल्या नंतर देखील भाईंदर येथील चौक समुद्र किनारी असलेल्या धारावी किल्ल्यात मद्यपान - धुम्रपानासह अनैतिक प्रकार सुद्धा होत असल्याचा आरोप गडप्रेमींनी केला आहे .

मीरारोड - राज्य मानवी हक्क आयोगाने दखल घेतल्या नंतर देखील भाईंदर येथील चौक समुद्र किनारी असलेल्या धारावी किल्ल्यात मद्यपान - धुम्रपानासह अनैतिक प्रकार सुद्धा होत असल्याचा आरोप गडप्रेमींनी केला आहे . किल्ल्याच्या साफसफाई दरम्यान दारूच्या बाटल्या , सिगारेटची पाकिटे तसेच निरोध सुद्धा सापडल्याने संताप व्यक्त होत आहे . दरम्यान आयोगाने पोलीस आयुक्तालय , जिल्हाधिकारी याना त्यांचे म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले असून महापालिकेने देखील वेळ मागितली आहे.

धारावी किल्ला हा पुरातन असून पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत येतो . या ठिकाणी महापालिकेने किल्ल्याच्या काही भागात चिमाजी अप्पा यांचा पुतळा , उद्यान आदी विकसित केले आहे .  गेल्या काही वर्षां पासून शिवप्रेमी व गडप्रेमी यांनी धारावी किल्ल्याच्या स्वच्छतेची नियमितपणे मोहीम चालवली आहे . किल्ल्याच्या संवर्धन व संरक्षणाचौ मागणी सातत्याने गडप्रेमींनी चालवली आहे.

महापालिकेने किल्ला दत्तक घेण्याची तयारी दर्शवली असून निधीची तरतूद केली आहे . खासदार राजन विचारे व आमदार गीता जैन यांच्या पाठपुराव्याने शासनाने देखील किल्ल्याचा पुनर्विकास साठी निधी मंजूर केला . महापालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांनी किल्ल्याचे पावित्र्य राखले जावे म्हणून नागरिकांना आवाहन करणारे सूचना फलक सुद्धा या ठिकाणी लावून घेतले आहेत.

किल्ल्यावरील मद्यपान , धूम्रपान आदी प्रकार सातत्याने घडत असल्याची दखल नुकतीच राज्य मानवी हक्क आयोगाने स्वतःहून घेतली आहे . आयोगाने दखल घेतल्या नंतर देखील  रविवार २७ नोव्हेम्बर रोजी श्रेयश सावंत, राहुल पानपट्टे, विनोद देसाई, शुभम ढोके, निखिल पाटील आदी गडप्रेमींना किल्ल्यात साफसफाई करताना दारूच्या बाटल्या, सिगरेट- गुटखा ची रिकामी पाकिटे व थोटके तर नेहमी प्रमाणे सापडलीच पण निरोधाची पॅकिट तसेच वापरलेले निरोध सुद्धा सापडले.  धारावी सारख्या मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या किल्ल्यावर मद्यपान , धूम्रपान पासून अनैतिक प्रकार होणे संतापजनक असल्याचे गडप्रेमींनी म्हटले आहे.

पोलीस व महानगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष किल्ल्याचे पावित्र्य नष्ट करण्यास कारणीभूत असून या पुढे गडप्रेमींना असे गैर कृत्य करताना कोणीही आढळून आल्यास त्याला चांगलाच चोप देण्यात येईल व पुढे काही झाल्यास त्याची जबाबदारी पोलीस आणि पालिकेची असणार आहे असा इशारा श्रेयस सावंत यांनी दिला आहे .

दरम्यान बुधवार ३० नोव्हेम्बर रोजी राज्य मानवी हक्क आयोगा समोर महापालिकेने माहिती दिली असली तरी सविस्तर माहिती देण्यासाठी पालिकेने वेळ मागितली . आयोगाने या प्रकरणी मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालय व ठाणे जिल्हाधीकारी यांना सुद्धा त्यांचे म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत . येत्या १३ डिसेम्बर रोजी त्यावर सुनावणी होणार आहे . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरbhayandarभाइंदर