पालघरच्या माजी नगराध्यक्षांसह मुंबईतील उद्धव सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा शिंदेसेनेत प्रवेश
By जितेंद्र कालेकर | Updated: January 5, 2025 19:51 IST2025-01-05T19:50:19+5:302025-01-05T19:51:14+5:30
ठाण्यातील आनंदाश्रम या टेंभी नाक्यावरील शिवसेना कार्यालयात उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये उद्धव सेनेच्या अनेक पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांनी शिंदे सेनेत प्रवेश केला.

पालघरच्या माजी नगराध्यक्षांसह मुंबईतील उद्धव सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा शिंदेसेनेत प्रवेश
ठाणे - गेल्या अडीच वर्षात राज्यात जी विकासकामे झाली, त्याच विकासकामांना लाेकांनी पसंती दिली. त्यांनी धनुष्यबाण आणि शिवसेनेवर शिक्कामाेर्तब केले. विधानसभा निवडणूकीत महायुतीचे २०० पेक्षा अधिक आमदार निवडून आले. यातूनच जनतेने विराेधकांची ताेंडे बंद केली. त्यांना कायमचे घरी बसविले. त्यामुळेच उद्धव सेनेचे नवी मुंबईचे जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भाेईर यांच्यासह अनेकांनी शिंदे सेनेत प्रवेश केल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दिली.
ठाण्यातील आनंदआश्रम या टेंभी नाक्यावरील शिवसेना कार्यालयात उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये उद्धव सेनेच्या अनेक पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांनी शिंदे सेनेत प्रवेश केला. त्यावेळी या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केल्यानंतर शिंदे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरे, शिवसेना, आनंद दिघे आणि हिंदुत्वाचे विचार घेऊन आपली शिवसेना पुढे जात आहे. ते नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीतील निकालावरुनही स्पष्ट झाले. शिवसेना आणि धनुष्यबाण यावर जनतेच्या न्यायालयाने शिक्कामाेर्तब केले. त्यामुळेच प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यातून लाेक येत असल्याचा दावाही शिंदे यांनी यावेळी केला.
तसेच केलेल्या विकास कामांमुळेच प्रत्येक जिल्हयातून आणि तालुक्यातून शिवसेना वाढीसाठी हे पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत. निवडणूक आयाेग आणि न्यायालय यांनाही दाेष देणाऱ्या विराेधकांनाच कायमचे घरी बसविण्याचे काम जनतेने केल्याचेही ते म्हणाले. गेल्या अडीच वर्षात जी लाेकहिताची कामे झाली त्याचीच लाेकांनी नाेंद घेतली. त्यामुळेच प्रत्येक जिल्हा तालुक्यातून शिवसैनिक येत आहेत या सर्वांचे आपण मनापासून स्वागत करीत असल्याचेही ते म्हणाले.
निवडणुकीपूर्वीच सांगितलं होते की, महायुतीचे २०० आमदार निवडून आणू. नाहीतर शेती करायला जाऊ. त्यानुसार आम्ही २०० हून अधिक उमदेवार निवडून आणले आहेत. आज ज्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. हे सर्वजण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन पुढे जातील, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
यांनी केला शिंदे सेनेत पक्ष प्रवेश
यावेळी नवी मुंबईतील उद्धव सेनेचे माजी जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भाेईर, माजी नगरसेवक विजयानंद माने, मेघाली राऊत , शाखाप्रमुख, अनेक विभागप्रमख तसेच पालघरच्या माजी नगराध्यक्षा प्रियंका पाटील, धुळयाचे सह संपर्कप्रमुख हिरालाल माळी हे अनेक पदाधिकारी यांच्यासह त्याच मुरबाड आणि नाशिकच्या कार्यकर्त्यांनी यावेळी माेठया संख्येने शिंदे प्रवेश केला. शिवसेना ही सर्व सामान्य माणसांना न्याय देणारी संघटना आहे. त्यामुळेच धनुष्यबाणावर ५७ तर महायुतीमधून २३२ उमेदवार निवडून आल्याचेही ते म्हणाले.