शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

माजी आमदार मेंडोन्सा यांचे निष्ठावंत माजी नगरसेवक भाजपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2018 10:14 IST

माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांच्या खास मर्जीतले निष्ठावंत मानले जाणारे माजी नगरसेवक भगवती शर्मा यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून भाजपात प्रवेश केलाय.

मीरा रोड - माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांच्या खास मर्जीतले निष्ठावंत मानले जाणारे माजी नगरसेवक भगवती शर्मा यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून भाजपात प्रवेश केलाय. मेंडोन्सा यांना मेहतांनी धक्का दिल्याचे मानले जातेय. यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे, तर शर्मा हे मेंडोन्सांसोबत असले तरी आतून मेहतांच्या संपर्कात असल्याच्या आरोपांचा मेंडोन्सा समर्थकांनी पुनरुच्चार केलाय .मीरा-भार्इंदर महापालिकेत भगवती शर्मा हे राष्ट्रवादीतुन नगरसेवक म्हणुन निवडुन आले होते. गटनेता पदाची जबाबदारी देतानाच पालिकेतली सूत्रं देखील तेच सांभाळत होते. गिल्बर्ट मेंडोन्सा यांच्या मर्जीतले म्हणून ओळख असलेले भगवती २०१२च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला तरी मेंडोन्सा यांनी त्यांना स्वीकृत नगरसेवक केले होते.भगवती शिवाय मेंडोन्सा यांचे पान हलत नसे असे बोलले जायचे. कोणाला भेटायचे, काय नियोजन करायचे यापासून अनेक जबाबदा-या ह्या मोठ्या विश्वासाने मेंडोन्सा हे भगवती यांच्यावरच टाकायचे.मेंडोन्सा यांचे कट्टर समर्थक पण नरेंद्र मेहतांचे विरोधक मानले जाणारया भगवती यांच्यावर काही मेंडोन्सा समर्थक मात्र त्यावेळी नेहमीच नाराज असायचे. भगवती आतुन मेहतांना मिळाल्याचे आरोप देखील केले जात होते. पण मेंडोन्सा यांनी भगवती यांना नेहमीच जवळ ठेवले . मेंडोन्सां सोबत ते देखील शिवसेनेत गेले होते. आॅगस्ट २०१७ च्या पालिका निवडणुकीत पुन्हा त्यांचा पराभव झाला होता.दरम्यान बुधवारी भगवती यांनी आमदार नरेंद्र मेहतां सोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली व भाजपात प्रवेश केला. त्या नंतर मेहताांसह जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे, सभापती ध्रुवकिशोर पाटील, डॉ. राजेंद्र जैन, नगरसेवक सुरेश खंडेलवाल, रवी व्यास, रीटा शाह आदिंनी भगवती यांचे स्वागत केले.त्यांच्या भाजपा प्रवेशा बद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तर काहींनी आतुन मेहतांशी हातमिळवणी होती हे स्पष्ट झाल्याचा दावा केलाय. मेंडोन्सा यांचे राजकिय डावपेच, राजकिय समीकरणं तसेच अंतर्गत बहुतांशी सर्वच माहिती भगवती यांना असल्याने आ. मेहतांना त्याचा चांगलाच फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भगवती यांना स्विकृत नगरसेवक पदाचं आश्वासन देखील भाजपा प्रवेशाच्या बदल्यात देण्यात आल्याची चर्चा आहे. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर