शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मेहता गटाचा विरोध डावलून फडणवीसांनी केले भाजपाच्या जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 19:14 IST

भाईंदर पश्चिमेस उड्डाण पुलाजवळ नवीन इमारतीच्या पहिल्या मजल्यावर जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे यांनी पक्षाचे जिल्हा कार्यालय सुरु केले आहे .

मीरारोड - भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या ७११ कंपनीच्या जागेतील भाजपाचे जिल्हा कार्यालय बंद करून भाईंदर पश्चिम येथे नवे जिल्हा कार्यालय सुरु करण्यात आले . विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीच नवीन कार्यालयाचे उदघाटन करून मेहता समर्थकांच्या विरोधाला जुमानले नाही असे मानले जात आहे . 

भाईंदर पश्चिमेस उड्डाण पुलाजवळ नवीन इमारतीच्या पहिल्या मजल्यावर जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे यांनी पक्षाचे जिल्हा कार्यालय सुरु केले आहे . त्याचे उदघाटन शुक्रवारी रात्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी महापौर ज्योत्सना हसनाळे, आमदार रवींद्र चव्हाण , निरंजन डावखरे , मिहीर कोटेचा , मुंबई पालिका गटनेते विनोद मिश्रा सह पालिकेतील पदाधिकारी , नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते . 

फडणवीस म्हणाले कि , पूर्वीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह व आताचे जे . पी . नड्डा यांनी प्रत्येक जिल्हा स्तरावर पक्षाचे स्वतःचे कार्यालय हवे असा निर्णय घेण्यात आला. जागा खरेदी करा व बांधकाम करा किंवा भाड्याने तरी घ्या पण पक्षाचे कार्यालय हवे . मीरा भाईंदर मध्ये जो पर्यंत स्वतःची जमीन घेऊन कार्यालय बांधता येत नाही तो पर्यंत स्वतःचे भाड्याने तरी कार्यालय सुरु करा असा निर्णय घेण्यात आला  आणि हे कार्यालय भव्य व चांगले आहे . पण स्वतःच्या मालकीचे कार्यालय लवकर करा . कार्यालयात बसणारे लोक किती लोकाभिमुख आहेत . ते किती संवेदनशील आहेत या आधारावर राजकीय पक्षाच्या कार्यालयाचे मूल्यमापन होते.

वास्तविक सेव्हन स्क्वेअर शाळे जवळील मेहतांच्या ७११ कन्स्ट्रक्शन कंपनीच्या जागेत भाजपाचे कार्यालय चालवले जात होते . परंतु इतक्या वर्षात मेहतांनी शहर व पालिकेतील भाजपाची सर्व सूत्रे हाती ठेवत पदे उपभोगताना पक्षाचे मालकीचे कार्यालय मात्र करून दिले नव्हते यावर टीका होत होती . 

जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे यांनी ७११ मधील जिल्हा कार्यालय नवीन जागेत सुरु करण्याचा निर्णय घेतल्याने मेहतांसह अनेक नगरसेवक , पदाधिकारी आदींनी रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन म्हात्रेंना हटवण्या पासून नवीन कार्यालयास विरोध केला होता . परंतु चव्हाण यांनी पक्षाचा निर्णय असल्याचे स्पष्ट केल्याने सर्व रिकाम्या हाताने परतले  होते . नवीन कार्यालयाचे उदघाटन फडणवीस यांच्या हस्ते होणार हे निश्चित असल्याने मेहता समर्थकांनी देखील उदघाटनास हजेरी लावली . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक