शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

पाणी कपात रद्द करण्यासह माजी खा. नाईक यांनी आयुक्तांकडे केल्या विविध मागण्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2018 15:03 IST

पाणी कपात रद्द करा, भुयारी मार्गाचे काम पुर्ण करा, उत्तन वासियांची कचऱ्यातून सुटका करा आदी विविध मागण्यांवर माजी खासदार संजीव नाईक यांनी महापालिका आयुक्त बळीराम पवार यांना भेटुन चर्चा केली.

मीरारोड - पाणी कपात रद्द करा, भुयारी मार्गाचे काम पुर्ण करा, उत्तन वासियांची कचऱ्यातून सुटका करा आदी विविध मागण्यांवर माजी खासदार संजीव नाईक यांनी महापालिका आयुक्त बळीराम पवार यांना भेटुन चर्चा केली. या वेळी पक्षाच्या वतीने ११ मागण्यांचे निवेदन दिले.बुधवारी मीरा भार्इंदर महापालिकेत आयुक्त दालनात माजी खासदार नाईक यांनी पक्षाचे माजी नगरसेवक प्रकाश दुबोले, पोर्णिमा काटकर, नरेंद्र भाटिया, संतोष गोळे, साजिद पटेल, शिल्पा सावंत, रमेश गायकवाड, भिलारे, साळुंके आदि पदाधिकारी - कार्यकर्ते सोबत आयुक्त पवार यांच्या सोबत चर्चा केली. या वेळी दुबोले यांनी केलेल्या ११ मागण्यांचे निवेदन नाईक यांनी आयुक्तांना दिले.शहरात पाणी कपात सुरु झाल्याने पाणी पुरवठा ३६ तासांच्या वर पोहचला असुन या आधी आम्ही प्रत्येकवेळी मीरा भार्इंदरला पाणी कपातीतुन वगळत नागरकिांना दिलासा दिला होता. पाणी कपात रद्द करा असे नाईक म्हणाले.भुमिगत गटार योजनेच्या कामाचा खर्च ५०० कोटींच्या वर गेला असताना काम रखडले आहे. त्यामुळे ठेकेदारावर कारवाई करा. उत्तन व परिसरातील रहिवाशी कचरा डंपींग मुळे त्रस्त असुन त्यांना दिलासा द्या. शहरात फेरीवाले व अनधिकृत बांधकामे वाढत असताना त्यावर नियंत्रण न ठेवणारया अधिकारयांवर कारवाई करा. टिडीआर घोटाळे, विकास आराखडा, पालिके कडुन केली जाणारी अनावश्यक व निकृष्ट दर्जाची बांधकामे , रखडलेले रस्ते, परिवहन सेवेची दुरावस्था आदी अनेक मुद्यांवर नाईक यांनी आयुक्तां कडे कारवाईची मागणी केली.मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री गेल्या दोन वर्षात शहरात सतत येत असुन विविध भुमपुजनं, उद्घाटनं करत आहेत. पण या कार्यक्रमांसाठी होणारा लाखो रुपयांचा खर्चाची कुठुन केला ? असा सावाल करत चौकशी करुन कारवाई करा असं निवेदनात म्हटलं आहे.आयुक्तांनी या वेळी पाणी कपात रद्द करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. उत्तन कचरा प्रकल्प सुरु करुन दुर्गंधी येणार नाही याची खबरदारी घेऊ तसेच निवेदनातील मागण्यांवर आवश्यक कार्यवाही करण्याचं आश्वासन आयुक्तांनी दिलं . काशिमीरा नाका येथील शिवाजी महाराजांचा पुतळा उंच करणं किंवा उड्डाण पुला पेक्षा उंच नविन पुतळा बसवण्यावर समिती विचार करत असल्याचे आयुक्तांनी सांगीतले. 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक