लग्न घरात जबरी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:36 IST2021-03-22T04:36:50+5:302021-03-22T04:36:50+5:30

मुंब्रा : लग्न घरातून एका चोराने रोख रक्कम आणि दागिने चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली. मुंब्र्यातील कौसा भागातील चांदनगर ...

Forced burglary at the wedding house | लग्न घरात जबरी चोरी

लग्न घरात जबरी चोरी

मुंब्रा : लग्न घरातून एका चोराने रोख रक्कम आणि दागिने चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली. मुंब्र्यातील कौसा भागातील चांदनगर परिसरातील अलफलक प्लाझा या इमारतीमध्ये राहत असलेल्या अब्दुल रईस याचा शुक्रवारी विवाह (निकाह) होता. त्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्य दुपारी साडेचार वाजता माहीम येथे गेले होते. तेथून रात्री एक वाजता ते परत आले. दरम्यानच्या काळात चोराने घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरातील कपाटामधील विविध प्रकारचे १ लाख १३ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख ८० हजार रुपये असा एकूण १ लाख ९३ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. मुंब्रा पाेलीस ठाण्यात याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Web Title: Forced burglary at the wedding house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.