शहरं
Join us  
Trending Stories
1
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
2
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
3
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
4
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
5
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
6
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
7
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
8
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
9
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
10
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
11
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
12
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
13
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
14
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
16
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
17
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
18
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
19
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
20
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप

ठाण्यात गटाराच्या लोखंडी जाळीत अडकला महिलेचा पाय: तासाभराने झाली सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 10:00 PM

ठाण्यातील राम मारुती रोडवरील एका गटाराच्या लोखंडी जाळीत सोमवारी सायंकाळच्या सुमारास महिलेचा पाय अडकला होता. त्यामुळे शहरातील लोखंडी जाळयांचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

ठळक मुद्देमदतीसाठी पाऊण तासाची प्रतिक्षाबघ्यांच्या गर्दीमुळे मदतीला अडथळावाहतूक कोंडीचाही अग्निशमन दलाला फटका

ठाणे: येथील राम मारुती रोड परिसरातील एका गटाराच्या लोखंडी जाळीमध्ये जयश्री रेमडे (५४) या महिलेचा पाय अडकल्यामुळे तिच्यासह स्थानिकांमध्ये चांगलीच घबराट पसरली होती. तासाभराच्या प्रयत्नानंतर ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने केलेल्या मदतीमुळे तिची या जाळीतून अखेर सुटका झाली आणि तिने सुटकेचा नि:श्वास सोडला.तीन हात नाका येथील ‘दिपज्योती’ सोसायटीमध्ये राहणा-या जयश्री या आपल्या पतीसमवेत सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास ठाणे स्टेशनकडे जात होत्या. त्याचवेळी राममारुती रोडवरील ‘राजमाता वडापाव’या दुकानासमोरील एका गटाराच्या चेंबरवरील लोखंडी जाळीत त्यांचा डावा पाय अडकला. हा पाय तसाच गटारात गेल्याने त्या अर्धवटपणे खाली पडल्या. पाय बाहेरच निघत नसल्यामुळे त्यांनी बरीच आरडाओरड केली. प्रयत्न करुनही पाय निघत नव्हता. त्यावेळी रस्त्यावरुन जाणा-या रिना राजे या महिलेने वाहतूक पोलिसांसह आपत्ती व्यवस्थापन विभागाला पाचारण केले. तेंव्हा अर्ध्या तासाने तिथे पोहचलेल्या आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी अर्ध्या तासांच्या अथक प्रयत्नांनंतर त्यांची या जाळीतून सुटका केली. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांच्या पायाला सूज आली सुदैवाने गंभीर दुखापत झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली. दरम्यान, जयश्री यांचा पाय अडकल्यानंतर त्यांना मदत करण्याऐवजी बघ्यांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळेही मदत कार्यात अडथळे येत होते. तर वाहतूक कोंडीमुळे अग्निशमन दलालाही पोहचण्यास उशिर झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. पाय अडकल्यापासून ते त्यातून सुटका होईपर्यंत मात्र या महिलेची भीतीने गाळण उडाली होती. पहाटेच्या दरम्यान कोणीतरी भंगार वेचकाने ही लोखंडी जाळी तोडण्याचा प्रयत्न केला असावा, त्यामुळेच ती तुटल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. पालिका प्रशासनाने या जाळयांची निगा ठेवली पाहिजे, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाAccidentअपघात