शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
4
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
5
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
6
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
7
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
8
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
9
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
10
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
11
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
12
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
13
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
14
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
15
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
16
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
17
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
18
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
19
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
20
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांपाठोपाठ आता उत्पादन शुल्क विभागाच्या दोन अधिकाऱ्यांसह चौघांवर निलंबनाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 21:11 IST

डान्सबार प्रकरणात आता पोलिसांपाठोपाठ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दोन दुय्यम निरीक्षकांसह चौघांवर निलंबनाची कारवाई मंगळवारी केली आहे. उत्पादन शुल्क विभागाचे राज्याचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी ही कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देउत्पादन शुल्कच्या आयुक्तांचे आदेशभाजपनेही केली होती मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: डान्सबार प्रकरणात आता पोलिसांपाठोपाठ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दोन दुय्यम निरीक्षकांसह चौघांवर निलंबनाची कारवाई मंगळवारी केली आहे. उत्पादन शुल्क विभागाचे राज्याचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी ही कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील आम्रपाली आणि अँटीक पॅलेस तसेच वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील नटराज या तीन्ही बारमध्ये कोरोनाचे सर्व नियम धुडकावून बारबाला नृत्य करीत असल्याचे प्रकरण समोर आले होते. याचीच दखल घेत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आदेशाने ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजित सिंह यांनी वर्तकनगर आणि नौपाडा या दोन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निलंबित केले. तर दोन सहायक पोलीस आयुक्तांची मुख्यालयात बदली केली. या कारवाई पाठोपाठ राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक आणि उपअधीक्षकांवरही कारवाईची मागणी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्कचे आयुक्त कांतीलाल उमप यांनी ठाण्यातील उत्पादन शुल्कच्या ए विभागाच्या कार्यक्षेत्रात येणाºया आम्रपाली (एफएल-३) अँटीक पॅलेस या बारवरील कारवाईत हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत बिट एकचे दुय्यम निरीक्षक बजरंग पाटील आणि जवान सुरेंद्र म्हस्के तसेच अँटीक पॅलेस या बारच्या कारवाईत हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत बिट दोनचे दुय्यम निरीक्षक प्रदीप सर्जने आणि जवान ज्योतिबा पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. कोविड नियमांच्या पालनाची अंमलबजावणीमध्ये पालन न करणे आणि कारवाईच्या जबाबदारीमध्ये अक्षम्य हेळसांड केल्याचा ठपका या अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे.* निलंबनाबरोबर बदलीचीही कारवाई-या चौघांच्या निलंबनाबरोबर त्यांची अन्य जिल्यांमध्ये उचलबांगडीही केली आहे. निलंबनाच्या कालावधीमध्ये दुय्यम निरीक्षक बजरंग पाटील आणि जवान म्हस्के यांना रायगड जिल्हयाच्या अधीक्षक कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे. तर दुय्यम निरीक्षक प्रदीपकुमार सरजिने आणि जवान पाटील यांनी निलंबन कालावधीमध्ये पालघर अधीक्षकांच्या कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे.* नटराजवरील कारवाईमुळे बी विभागाला अभय-रात्री उशिरापर्यंत नटराज बार चालू ठेवल्यामुळे बी विभागाचे निरीक्षक शिवशंकर पाटील यांनी या बारवर कारवाई केली होती. त्यामुळेच निलंबनाच्या कारवाईतून बी विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाºयांना अभय मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीExcise Departmentउत्पादन शुल्क विभाग