नियम पाळा; अन्यथा कारवाई होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:16 IST2021-02-21T05:16:21+5:302021-02-21T05:16:21+5:30

अंबरनाथ : एकीकडे कोरोनाचा प्रसार वाढू लागलेला असताना नागरिकांमधून अजूनही पुरेशी काळजी घेतली जात नाही. त्यामुळे यापुढे नियम पाळा; ...

Follow the rules; Otherwise action will be taken! | नियम पाळा; अन्यथा कारवाई होणार!

नियम पाळा; अन्यथा कारवाई होणार!

अंबरनाथ : एकीकडे कोरोनाचा प्रसार वाढू लागलेला असताना नागरिकांमधून अजूनही पुरेशी काळजी घेतली जात नाही. त्यामुळे यापुढे नियम पाळा; अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

राज्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे. बाजारात, सार्वजनिक ठिकाणी फिरताना अनेक नागरिक मास्क वापरत नाहीत. विक्रेते, दुकानदार यांच्याकडूनही नियम पळाले जात नाहीत. त्यामुळे यापुढे नियम पळाले नाहीत, तर दुकानदार, विक्रेते यांच्यासह नागरिकांवरही कारवाई करण्याचा इशारा शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भोगे यांनी दिला. राजकीय पक्षांकडूनही गर्दी जमवणारे कार्यक्रम आयोजित न करण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे.

------------

Web Title: Follow the rules; Otherwise action will be taken!