दहा रुपयांत बस तिकिटाचा पुणे पॅटर्न राबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:42 IST2021-08-22T04:42:42+5:302021-08-22T04:42:42+5:30

मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बसचे शहरांतर्गत फक्त दहा रुपयांत कुठेही प्रवास करा, अशी पुणे पॅटर्नप्रमाणे सुविधा ...

Follow the Pune pattern of bus ticket for Rs | दहा रुपयांत बस तिकिटाचा पुणे पॅटर्न राबवा

दहा रुपयांत बस तिकिटाचा पुणे पॅटर्न राबवा

मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बसचे शहरांतर्गत फक्त दहा रुपयांत कुठेही प्रवास करा, अशी पुणे पॅटर्नप्रमाणे सुविधा नागरिकांना देण्याची मागणी नगरसेविका हेतल परमार यांनी केली आहे. याबाबत परमार यांनी पालिका प्रशासन व परिवहन सभापती यांच्याकडे लेखी पत्र दिले आहे.

महापालिकेत भाजपची सत्ता असून, परिवहन सभापती भाजपचे आहेत. त्या अनुषंगाने भाजपच्या नगरसेविका परमार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे येथे झालेल्या ‘दस में बस’ योजनेचा संदर्भ देऊन तशीच योजना मीरा-भाईंदरमध्ये सुरू करावी, अशी मागणी केली आहे. पुणे महापालिकेच्या बसमधून या योजनेंतर्गत नागरिकांना दहा रुपयांत शहरात कुठेही प्रवास करता येतो. मीरा-भाईंदरमध्येही शहरांतर्गत नागरिकांना दहा रुपयांत कुठेही प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्यास त्यांची मोठी बचत होईल, शिवाय सार्वजनिक परिवहन उपक्रमाचा वापर वाढून रस्त्यावरील वाहतूककोंडी कमी होऊ शकेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Follow the Pune pattern of bus ticket for Rs