शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

‘ती फुलराणी’त रसिकांना फुटला घाम

By admin | Updated: April 15, 2016 01:27 IST

गैरव्यवस्थापनामुळे आधीच पांढरा हत्ती ठरलेल्या आणि सक्षमपणे चालवता येत नसलेल्या कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरातील वातानुकूलन यंत्रणेत बिघाड झाल्याचा फटका

कल्याण : गैरव्यवस्थापनामुळे आधीच पांढरा हत्ती ठरलेल्या आणि सक्षमपणे चालवता येत नसलेल्या कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरातील वातानुकूलन यंत्रणेत बिघाड झाल्याचा फटका गुरुवारी नाट्यरसिकांना बसला. ‘ती फुलराणी’ नाटकावेळी रसिकांसोबत कलाकारही घामाघूम झाले. मध्यंतरावेळी रसिकांचा पारा चढल्याने तासभर प्रयोग सुरू होऊ शकला नाही. संतप्त प्रेक्षकांनी नाट्यगृहात गोंधळ घातला. काही प्रेक्षकांनी पैसे परत मागितले, तर काहींनी प्रयोग तसाच सुरू ठेवण्याची मागणी केल्याने गोंधळ वाढला. अखेर, कसाबसा एसी सुरू करून पालिकेने आपली सुटका करून घेतली. पण, यामुळे पालिकेच्या ताब्यातील नाट्यगृहांच्या अवस्थेचा मुद्दा पुन्हा चव्हाट्यावर आला. अत्रे रंगमंदिरात सायंकाळी साडेचार वाजता ‘ती फुलराणी’चा प्रयोग होता. त्याला २७० प्रेक्षक हजर होते. पहिला अंक सुरू असतानाच प्रेक्षकांना, कलाकारांना उकाड्याचा त्रास होऊ लागला. मध्यंतर होताच प्रेक्षकांनी त्याचा जाब विचारला आणि जोवर एसी सुरू होत नाही, तोवर प्रयोग सुरू न करण्याचा मुद्दा लावून धरला. सुविधा देता येत नसतील, तर तिकिटाचे पैसे परत करा. खेळ थांबवा. आमचा रसभंग झाला आहे, असे मुद्दे तावातावाने मांडले. नाटकाचे निर्माते धनंजय चाळके यांनी ज्या प्रेक्षकांना पैसे परत हवे असतील, त्यांना पैसे परत केले जातील, असे स्टेजवरून जाहीर केले. काही प्रेक्षकांनी प्रयोग बंद करण्याची मागणी केली, तर काहींनी एसी सुरू करून पुढचा अंक सादर करण्याची भूमिका घेतल्याने प्रेक्षकांतच दोन तट पडले. ते हमरीतुमरीवर आल्याने कलाकारही अस्वस्थ झाले. (प्रतिनिधी)व्यवस्थापकांचा दोषअखेर, ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक स्टेजवर आले. एसी नादुरुस्त असल्याचा फटका कलाकारांनाही बसल्याचे त्यांनी सांगितले आणि यात नाट्यगृहाच्या व्यवस्थापकांचा दोष असल्याचे मत मांडले. मात्र, संतापलेल्या काही प्रेक्षकांनी ओक यांनाही बोलू दिले नाही. तोवर, कसाबसा एसी सुरू करून नाटकाचा पुढचा अंक सुरू झाला. तोवर, काही प्रेक्षक बाहेर पडले. त्यांनी तिकिटाचे पैसे परत घेतले. आमचा विरोध नाटकाला नाही, तर गैरव्यवस्थापनाला असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच वेळी बाजारपेठ ठाण्यातील पोलीस आले. या नाटकाला कल्याण-डोंबिवली महापालिकेचे सचिव सुभाष भुजबळ उपस्थित होते. पण, त्यांनी वादात मध्यस्थी केली नाही. प्रेक्षकांचा गोंधळ सुरू असताना नाट्यगृहाचे व्यवस्थापक समोर आले नाहीत की, त्यांनी बाजू मांडली नाही.