भिवंडीत पूर ओसरला, मात्र भातशेती पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 10:59 PM2019-08-07T22:59:24+5:302019-08-07T22:59:27+5:30

पावसाने सोमवारपासून उसंत घेतल्याने शहर व ग्रामीण भागातील पूर ओसरला

Flooding broke out, but paddy was under water | भिवंडीत पूर ओसरला, मात्र भातशेती पाण्याखाली

भिवंडीत पूर ओसरला, मात्र भातशेती पाण्याखाली

googlenewsNext

भिवंडी : शुक्रवारपासून कोसळणाऱ्या पावसाने सोमवारपासून उसंत घेतल्याने शहर व ग्रामीण भागातील पूर ओसरला आहे. मात्र खाडीकिनारी असलेल्या अनेक गावांमधील भातशेती पाचव्या दिवशीही पाण्याखाली असल्याने भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाने हजेरी लावल्याने शेतीच्या कामांना वेग आला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी भातलावणीच्या कामाला सुरूवात केली होती.

शुक्र वारपासून पावसाने जोरदार सुरु वात केल्याने मागील तीन दिवसांपासून सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाल्याने तालुक्यातील खाडीकिनारी असलेल्या डुंगे, वडघर, वडूनवघर, खारबाव, टेंभीवली, कोनगाव, पिंपळास, मालोडी, पाये, पायगाव ,केवणी दिवे, अंजूर , अलीमघर , वेहळे , भरोडी आदी गावातील भातशेती पाण्याखाली गेली असल्याने पिके कुजून गेली. शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
चार दिवसांपासून मुसळधार पाऊस झाल्यामुळे सर्वत्र पूरिस्थती निर्माण झाली होती. या पुराचा फटका ज्या शेतकरी व ग्रामस्थांना बसला त्या बाधित शेतकºयांच्या मालमत्तेच्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. पंचनामे प्राप्त होताच सरकारी निर्देशानुसार बाधित शेतकरी व नागरिकांना भरपाई देण्यात येईल, अशी प्रतिक्रि या भिवंडीचे तहसीलदार शशिकांत गायकवाड यांनी दिली आहे. हातातोंडाशी आलेली पिके वाया गेल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. सरकारने आम्हाला मदत करावी अशी मागणी या शेतकºयांनी केली आहे.

Web Title: Flooding broke out, but paddy was under water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.