शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
3
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
4
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
5
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
6
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
7
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
8
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
9
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
10
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
11
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
12
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
13
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
14
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
15
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
16
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
17
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
18
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
19
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
20
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?

पूरपरिस्थितीवरून महासभेत प्रशासनाला धरले धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 02:18 IST

नको त्या विकास प्रकल्पांमुळेच ठाण्याची दैना; लोकप्रतिनिधींची टीका

ठाणे : शहरात ओढवलेल्या पूरपरिस्थितीचा सामना पालिकेने केला असला तरी ही परिस्थिती निर्माण होण्यामागे कोण जबाबदार आहे, असा सवाल करून सर्वपक्षीय लोकप्रतिनिधीनी मंगळवारी झालेल्या महासभेत प्रशासनाला धारेवर धरले. नाल्याचा प्रवाह बदलला जात आहे, खाडीचे आकारमान कमी करून तिथे विकासकांनी टाकलेले भराव, खाडीविकास प्रकल्प, चौपाटी प्रकल्प या सर्वांमुळेच आज ठाण्यावर ही परिस्थिती ओढवली असल्याचा आरोप यावेळी नगरसेवकांनी केला. त्यामुळे केवळ बोटी फिरवून व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो टाकण्यापेक्षा ही वेळ का आली याचा अभ्यास करण्याची वेळ आता आल्याची टीका काँग्रेसेचे गटनेते विक्रांत चव्हाण यांनी केली.महासभा सुरू होताच राष्टÑवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी शहरात झालेल्या पावसामुळे जी काही पूरपरिस्थिती निर्माण झाली, त्याला दोषी कोण असा सवाल करून या चर्चेला सुरुवात केली. मोठमोठे प्रकल्प सुरू करण्यासाठी सल्लागार नेमले जातात. मात्र, शहरात आज जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याचा अभ्यास करायला पालिकेला वेळ नाही का? असा सवाल त्यांनी केला. खाडीत बांधकामे होत आहेत, घोडबंदर, वाघबीळ, कासारवडवली आदी भागांत यापूर्वी पाणी शिरले नव्हते. त्या भागातही आता पाणी साचले होते, रस्त्यांच्या बाजूला कल्व्हर्ट बसविले जात नाहीत, मुंब्रा स्टेडियममध्येही गुडघाभर पाणी साचले होते. रस्त्याच्या कडेला, खाडीच्या बाजूला, नाल्याच्या बाजूला भराव टाकला जात आहे. डेब्रिज टाकले जात आहे. मात्र, तो कोण उचलणार, त्याला कोण वाली, डेब्रिजवर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पाचे पुढे काय झाले, आदींसह इतर मुद्यावरून त्यांनी प्रशासनाला फैलावर घेतले. हाच धाग पकडून विक्रांत चव्हाण यांनी शहरात यापूर्वीही पाणी साचत होते. मात्र, त्याचा निचरा होत नाही, नाल्यांचा प्रवाह बदलला जात आहे. विकासकांचे इमले बांधतांना डेब्रिज कुठेही कशाही स्थितीत टाकले जात आहे. खाडी, नाल्यांच्या किनाºयावरील अनेक प्रकल्पांना तत्काळ मंजुरी दिली जात आहे. त्यामुळेच आज ठाण्यावर ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप त्यांनी केला. चौपाटी विकसित केल्या जात आहेत. आता तर जलवाहतूक सुरू करण्यासाठी प्रयत्न आहेत. परंतु, हे करीत असतांना त्याचा शहरावर काय विपरित परिणाम होतो, याचे भान राखण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच पूरस्थिती का आली याचा कुठेतरी अभ्यास करण्याची वेळ आली असल्याचेही त्यांनी सांगितले.पूरग्रस्तांना आर्थिक मदत देण्याची मागणीउपवन तलावाच्या ठिकाणी चोहोबाजूंनी बांधकामे झाली आहेत, त्यामुळे तलावातील पाण्याला बाहेर पडण्यास जागाच नसल्याने या भागांतही पाणी साचण्याचे प्रकार घडले आहेत. यावर तत्काळ उपाय करण्याची मागणी चव्हाण यांनी केली. हिरानंदानी इस्टेटसारख्या भागातही पाणी साचले होते. येथील नाल्याचे काम अर्धवट अवस्थेत असल्याकडे भाजपचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी लक्ष वेधले. तर या पुरामुळे नुकसान झालेल्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी राष्टÑवादीचे शानू पठाण व अशरीन राऊत यांनी केली.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका