शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्तांचे मदत साहित्य तब्बल १४ वर्षांपासून ठाण्यात धूळखात पडून, भाजप नगरसेवकाचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 02:27 IST

दोन आठवड्यांपूर्वी पुराने लोकांचे मोठे नुकसान केले. त्यांना मदत मिळावी म्हणून महापालिका आयुक्तांनी अत्यावश्यक साहित्याच्या किट देऊ केल्या होत्या. परंतु...

ठाणे : दोन आठवड्यांपूर्वी पुराने लोकांचे मोठे नुकसान केले. त्यांना मदत मिळावी म्हणून महापालिका आयुक्तांनी अत्यावश्यक साहित्याच्या किट देऊ केल्या होत्या. परंतु, त्या पूरग्रस्तांपर्यंत पोहोचल्याच नसल्याची बाब शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत उघड झाली. २००५ सालीसुद्धा अशीच परिस्थिती होती. त्यावेळचे साहित्य दादोजी कोंडदेव स्टेडिअममध्ये गेली १४ वर्षे धूळखात पडून असून त्यापैकी अर्धे साहित्य भंगारात विकल्याचा आरोप भाजपचे नगरसेवक भरत चव्हाण यांनी केला.दिवा, कोपरी, मुंब्रा, कळवा आदींसह शहरातील इतर भागातही पूरस्थिती निर्माण झाली होती. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी तातडीची मदत म्हणून धान्य आणि इतर साहित्याचे किट सर्व्हे करून पूरग्रस्तांना देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार, प्रभाग समितीनिहाय सर्व्हे केला होता. कोपरीतही असा सर्व्हे केला. या भागात १५०० च्या आसपास पूरग्रस्त आढळले. त्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी ५०० कुपन आणून १००-१०० याप्रमाणे नगरसेवकांना दिले. या भागातील काही नगरसेवक नवीन असल्याने त्या कुपनच्या मागेच त्यांनी आपले शिक्के मारून ती मदत पूरग्रस्तांपर्यंत पोहोचवली. मात्र, प्रत्यक्षात १५०० जणांना मदत मिळणे अपेक्षित असताना काही जणांनाच ती मिळाल्याने उर्वरित पूरग्रस्त नाराज झाले असून त्याची उत्तरे आता नगरसेवकांनाच द्यावी लागत आहेत. ही पूरग्रस्तांची चेष्टा असून यामध्ये पालिकेचे अधिकारीच दोषी असल्याचा आरोप त्यांनी केला. शिवाय, जे खरे पूरग्रस्त होते, त्यांच्यापर्यंत ही मदत पोहोचलीच नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.प्रभारी सभापतींची सारवासारव : २००५ साली पुरामध्ये अनेकांचे नुकसान झाले होते. त्यावेळचे साहित्य आजही दादोजी कोंडदेव क्रीडागृहात धूळखात पडले असल्याचा गौप्यस्फोट चव्हाण यांनी केला. काही साहित्य भंगारात विकले जात आहे, तर काही आता इतर ठिकाणी वाटले जात असल्याची शंकाही त्यांनी उपस्थित केली. यावर अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांनी अधिकाऱ्यांनी रात्री २ वाजेपर्यंत जागून ही कामे केली असून याबाबत शंका उपस्थित करणे चुकीचे असल्याचे सांगितले. नरेश म्हस्के यांनी पालिकेने आपल्या परिने मदत केल्याचे सांगून सारवासारव केली. 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाfloodपूर