शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

हिमाचल प्रदेशातून मुंबईत विमानवारी अन् ठाण्यात चोरी; अट्टल चोरटा जेरबंद, दागिने हस्तगत

By जितेंद्र कालेकर | Updated: July 31, 2024 17:02 IST

त्रिपुरातून खास विमानाने मुंबईत उतरल्यानंतर राजू हा जोगेश्वरी रेल्वे स्टेशन बाहेरील एका गटाराच्या खालच्या भागात भूमीगतपणे वास्तव्य करीत होता.

ठाणे : खास चोरी करण्यासाठी त्रिपुरातून ठाण्यात येणाऱ्या राजू मोहंमद जेनल शेख उर्फ बंगाली (वय-४१ वर्षे, रा. मोरी रोड, माहिम, मुंबई. मुळ रा. विशाळगड, जि. सोनामोरा, अगरतळा, त्रिपुरा) या अट्टल चोरट्याला अटक केल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी बुधवारी दिली. त्याच्याविरुद्ध मुंबई, ठाणे आणि गुजरातमध्ये १० ते १५ गुन्ह्यांची नोंद आहे.

त्रिपुरातून खास विमानाने मुंबईत उतरल्यानंतर राजू हा जोगेश्वरी रेल्वे स्टेशन बाहेरील एका गटाराच्या खालच्या भागात भूमीगतपणे वास्तव्य करीत होता. रात्रीच्या अंधारात बाहेर पडून ठाण्यातील वागळे इस्टेटमध्ये तो चोऱ्या करायचा. एकदम विमानाने तो त्रिपुरा गाठत असल्याने मुंबई किंवा ठाण्यातील पोलिसांना तो हाती लागत नव्हता. ठाण्यातील श्रीनगर पोलिस ठाण्यात काही दिवसांपूर्वी एका घरात चोरी झाली होती. यात सोने चांदीचे काही दागिनेही चोरीस गेले होते. हा तपास श्रीनगर पोलिसांबरोबरच गुुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट पाचच्या पथकाकडून सुरु असतांना हाच अट्टल चोरटा राजू ठाण्यात चोरीतील सोने चांदीचे दागिने विक्रीसाठी वागळे इस्टेट कामगार नाका या भागात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास घाेडके यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे २५ जुलै २०२४ रोजी सहायक पोलिस आयुक्त शेखर बागडे, निरीक्षक घाेडके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक भूषण शिंदे, पल्लवी ढगे, अविनाश महाजन आणि उपनिरीक्षक तुषार माने आदींच्या पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून वागळे इस्टेट, श्रीनगर भागातून चोरी केलेले सोने चांदीचे दागिने आणि २५ हजारांची रोकड असा एक लाख १३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सखोल चौकशीमध्ये ठाण्याच्या श्रीनगर मधील चार आणि कापूरबावडीमधील तीन आणि इतर मुंबईतील अशा ११ चोरीच्या गुन्हयांची त्याने कबूली दिली.गुजरामध्ये ‘लाप्ता’ अंतर्गत कारवाई-राजू गेल्या आठ ते दहा वर्षांपासून चोरीचे गुन्हे करीत आहेत. तो कधी गुजरात, कधी त्रिपुरा तर कधी मुंबईत चोऱ्या करतो. गुजरातमध्ये वाढत्या गुन्हेगारी कारवायांमुळे त्याच्यावर ‘लाप्ता’ कायद्यांतर्गतही कारवाई झाली. त्यामध्येही शिक्षा भोगून तो कारागृहातून बाहेर पडला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसThiefचोर