पार्किंगसाठी पाच वृक्षांवर कुऱ्हाड?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 11:53 PM2019-06-21T23:53:02+5:302019-06-21T23:53:10+5:30

मीरा रोडमधील प्रकार; उद्यान अधीक्षकांवर कारवाईची मागणी

Five trees for Kurchad for parking? | पार्किंगसाठी पाच वृक्षांवर कुऱ्हाड?

पार्किंगसाठी पाच वृक्षांवर कुऱ्हाड?

Next

मीरा रोड : मीरा रोडच्या एका गृहनिर्माण संस्थेच्या आवारात असलेली सुमारे ४० फूट उंचीची पाच हिरवीगार झाडे तोडल्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. धडधाकट असलेली ही झाडे धोकादायक ठरवून पार्किंगसाठी महापालिकेच्या संगनमताने तोडल्याचा आरोप भाजपच्या नगरसेविका नीला सोन्स आणि नगरसेवक विजय राय यांनी केला आहे. याप्रकरणी उद्यान अधीक्षक नागेश वीरकर यांच्यासह संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

मीरा रोडच्या हाटकेश भागातील जीसीसी क्लबजवळ सेंट फ्रान्सिस ही गृहनिर्माण संस्था आहे. या संस्थेने १५ एप्रिलला महापालिकेस त्यांच्या आवारातील चार पॅल्ट्राफारम आणि एक बदामाचे अशी पाच झाडे तोडण्याची परवानगी मागितली होती. ही झाडे किंवा त्यांच्या फांद्या पडून जीवितहानीची शक्यता वर्तवण्यात आली होती. तसेच पार्किंगसाठी अडथळा ठरत असल्याचेही नमूद केले होते. दरम्यान, एका क्लबच्या पार्किंगसाठी ही वृक्षतोड झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

झाडे तोडण्याचा प्रस्ताव आयुक्त तथा वृक्ष प्राधिकरण समितीचे अध्यक्ष बालाजी खतगावकर यांनी १३ जूनला मंजूर केला. त्यानंतर, त्याच दिवशी वीरकर यांनी गृहनिर्माण संस्थेला पत्र देऊन २५ हजार इतकी अनामत रक्कम कार्यालयात भरून २५ झाडे लावून ती जगवल्याचे निदर्शनास आणल्यावर अनामत रक्कम परत केली जाईल, असे कळवले. संस्थेने पालिका अधिकाऱ्याने सुचवलेल्या ठेकेदाराकडून ही झाडे पूर्णत: कापून टाकली. झाडे तोडल्याने त्यावरील पक्ष्यांची घरटीही नष्ट झाली. हा प्रकार नगरसेविका नीला सोन्स व नगरसेवक विजय राय यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ याबाबत आयुक्तांकडे तक्रार केली. ही झाडे ३० ते ४० फूट उंच आणि धडधाकट असताना तसेच कोणत्याही विकासकामांत अडथळा नसताना उद्यान अधीक्षक वीरकर यांनी सोेसायटीच्या पदाधिकाऱ्यांसोबत संगनमताने जागा मोकळी करण्यासाठी झाडांची कत्तल केल्याचा आरोप या नगरसेवकांनी केला आहे.

...तर न्यायालयात धाव घेणार!
पालिका अधिकाºयांनी तुमचीही दिशाभूल केली असल्याचे सांगत वीरकर आणि संबंधितांवर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करा, अन्यथा तुमच्याविरोधात सरकार आणि उच्च न्यायालयात जावे लागेल, असा इशाराही राय व सोन्स यांनी दिला आहे. वीरकर यांनी झाडे धोकादायक होती आणि नगरसेवक राय यांना वस्तुस्थिती समजावली आहे, असे सांगितले.

Web Title: Five trees for Kurchad for parking?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.