पाच हजारांसाठी मित्राचा खून करणाऱ्यास अटक

By Admin | Updated: August 4, 2015 01:12 IST2015-08-04T01:12:39+5:302015-08-04T01:12:39+5:30

उसने घेतलेले पाच हजार रुपये परत न करणाऱ्या सुधीर सिंग (३३) या मित्राचा खून करणाऱ्या अनिल राजबीर वाल्मीकी (२३) याला वर्तकनगर

Five thousand people arrested for murdering a friend | पाच हजारांसाठी मित्राचा खून करणाऱ्यास अटक

पाच हजारांसाठी मित्राचा खून करणाऱ्यास अटक

ठाणे : उसने घेतलेले पाच हजार रुपये परत न करणाऱ्या सुधीर सिंग (३३) या मित्राचा खून करणाऱ्या अनिल राजबीर वाल्मीकी (२३) याला वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याला ६ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
वर्तकनगरच्या साईबाबा मंदिराच्या बाजूला असलेल्या शासकीय निवासस्थानातील इमारत क्र. ४३ च्या तळ मजल्यावर ३१ जुलै २०१५ रोजी सायंकाळी ५ ते १० वा.च्यादरम्यान हा प्रकार घडला. एकमेकांचे मित्र असल्याने सुधीरने अनिलकडून काही दिवसांपूर्वी पैसे उसनवार घेतले होते. ते वारंवार मागूनही त्याने ते परत केले नव्हते. त्यातूनच त्यांच्यात भांडणेही होत होती. मद्यप्राशन करून दोघेही अनिलच्या घरी गेले. तिथे पुन्हा त्यांच्यात वाद झाल्यावर अनिलने सुधीरच्या डोक्यात घरातील कोयत्याने सपासप वार केले. वर्मी घाव लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर अनिलने घराला कुलूप लावून पलायन केले. नंतर त्याने वर्तकनगर पोलिसांकडे स्वत:च या खुनाची कबुली दिली.

Web Title: Five thousand people arrested for murdering a friend