शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीच्या पाच शाळा बंद, पटसंख्येला लागली घरघर, चार शाळांचा निर्णय तूर्तास स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 06:05 IST

केडीएमसीच्या शाळांची पटसंख्या घटल्याने त्या बंद करण्याची नामुष्की शिक्षण विभागावर ओढावली आहे. पाच शाळा गुरुवारी बंद करण्यात आल्या. अन्य चार शाळांचाही निर्णय घेण्यात आला होता. मात्र, वाढता विरोध पाहता त्यांच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली.

कल्याण : केडीएमसीच्या शाळांची पटसंख्या घटल्याने त्या बंद करण्याची नामुष्की शिक्षण विभागावर ओढावली आहे. पाच शाळा गुरुवारी बंद करण्यात आल्या. अन्य चार शाळांचाही निर्णय घेण्यात आला होता. मात्र, वाढता विरोध पाहता त्यांच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली. महिनाअखेरीस पुन्हा पटसंख्येचा आढावा घेतला जाणार असल्याने या शाळाही बंद होण्याच्या मार्गावर आहेत.पटसंख्या घटल्याचे कारण पुढे करत शाळा क्रमांक २३ नवापाडा (डोंबिवली पश्चिम), क्रमांक १४ काटेमानिवली, क्रमांक ६५ आनंदवाडी क्रमांक (दोन्ही कल्याण पूर्व), ८२ ब्राम्हण सभा परिसर, क्रमांक ८३ रामचंद्र टॉकिज (दोन्ही डोंबिवली पूर्व) अशा पाच शाळा बंद करण्यात आल्या आहेत. या शाळांमधील विद्यार्थ्यांना लगतच्या अन्य शाळांमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. मात्र, शाळा क्रमांक ४२ गौरीपाडा, क्रमांक ४ रामबाग, क्रमांक ५४ मोहिली, क्रमांक ६ हनुमाननगर या चार शाळाही बंद करण्याचे परिपत्रक शिक्षण विभागाने जारी केले होते. परंतु, कल्याण पश्चिम भाजपा शहरअध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांच्या शिष्टमंडळाने उपायुक्त नितीन नार्वेकर यांची भेट घेऊन या शाळेची पटसंख्या चांगली असल्याकडे लक्ष वेधले होते. या शाळेत ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील मुले शिकतात. शाळा बंद झाल्यास त्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात येईल. तरीही शाळा बंद केल्यास आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, कल्याण या संघटनेचे पदाधिकारी निलेश वाबळे, नरेंद्र सोनजे आणि भगवान हमरे यांनीही नार्वेकर आणि शिक्षण अधिकारी जे. जे. तडवी यांची भेट घेऊन संबंधित निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली. महापालिका शाळांमध्ये सर्वसाधारणपणे गरीब विद्यार्थी शिकतात. शिक्षकांनी सर्वेक्षण करून हे विद्यार्थी गोळा केले आहेत. ऐन शालेय वर्ष सुरू असताना शिक्षण विभागाने घेतलेला निर्णय विद्यार्थ्यांसाठी योग्य नसल्याकडे संबंधित पदाधिकाºयांनी लक्ष वेधले होते. काही शाळांची पटसंख्या चांगली असताना त्या बंद करण्याचा निर्णय कसा काय घेतला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता.दरम्यान, शिक्षण विभागाने संबंधित शिक्षकांची बैठक घेत शाळा बंद करण्याचा निर्णय कळविला. त्यावेळी त्यांनी नऊपैकी चार शाळांचा निर्णय स्थगित केला जात असल्याचेही स्पष्ट करत तेथील शिक्षकांना शाळेत रुजू होण्याच्या सूचना केल्या.‘विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही’पटसंख्या कमालीची घटल्याने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. यात तेथील विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. त्यांना नजीकच्या शाळांमध्ये स्थलांतर केले आहे. सध्या पाच शाळा बंद केल्या आहेत. उर्वरित चार शाळांचा आढावाअंती निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महापालिकेचे शिक्षण अधिकारी जे. जे. तडवी यांनी दिली.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी