शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

तीन पेट्रोलपंप मालकांसह पाच जणांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 22:31 IST

ठाणे, दि. 13 - पेट्रोलपंप घोटाळ्याप्रकरणी ठाणे शहर पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर आता या प्रकरणात ‘रडार’वर असलेल्यांचे अटकसत्रही सुरू केले आहे. आतापर्यंत शहर पोलिसांनी तीन मालकांसह पाच जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पेट्रोलपंपांवर वाहनांमध्ये पेट्रोल, डिझेल टाकणा-या डिस्पेन्सिंग युनिटमध्ये पल्सरनामक यंत्र असते. त्यामध्ये हेराफेरी करून ग्राहकांना कमी इंधन देणा-या पेट्रोल पंपांवर ठाणे शहर ...

ठाणे, दि. 13 - पेट्रोलपंप घोटाळ्याप्रकरणी ठाणे शहर पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर आता या प्रकरणात ‘रडार’वर असलेल्यांचे अटकसत्रही सुरू केले आहे. आतापर्यंत शहर पोलिसांनी तीन मालकांसह पाच जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. 

पेट्रोलपंपांवर वाहनांमध्ये पेट्रोल, डिझेल टाकणा-या डिस्पेन्सिंग युनिटमध्ये पल्सरनामक यंत्र असते. त्यामध्ये हेराफेरी करून ग्राहकांना कमी इंधन देणा-या पेट्रोल पंपांवर ठाणे शहर पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांच्या आदेशानुसार, ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने डोंबिवलीत पहिली कारवाई 17 जून 2017 रोजी केली. त्यानंतर, राज्यभरात गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकांमार्फत कारवाईचे सत्र सुरू केले. आतापर्यंत राज्यात टाकलेल्या 175 ठिकाणच्या छाप्यात 94 ठिकाणी मापात पाप असल्याची बाब पुढे आली होती. तसेच याप्रकरणी आतापर्यंत 24 जणांना अटक केली असून ते सर्व जण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यातील 23 जणांविरोधात मुख्य आणि पुरवणी असे दोन दोषारोपपत्र काही दिवसांच्या अंतरावर न्यायालयात सादर केले आहे. 

याप्रकरणी आता रडारवर असलेले पेट्रोलपंपांचे मालक आणि टेक्नीशिअन यांच्याविरोधात अटकसत्र केले आहे. सोमवारी रायगड येथील समर्थ कृपा पेट्रोलपंपाचे मालक जयदास तरे आणि टेक्नीशिअन विनोद अहिरे या दोघांना अटक केली. त्यानंतर, मंगळवारी कल्याण-शीळफाटा, काटईनाका येथील साई पेट्रोलपंपाचे मालक संजयकुमार यादव आणि बुधवारी हाजी मलंगगड येथील सद्गुरू पेट्रोपपंपाचे मालक बाळाराम गायकवाड व टेक्नीशिअन डबरूधर मोहंतो अशा तिघांना अटक केली. अहिरे आणि तरे यांना गुरुवारपर्यंत तर उर्वरित तिघांना शुक्रवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती एका वरिष्ठ अधिका-याने दिली. अहिरे याने डोंबिवलीतील तर मोहंतो याने नागपुरातील पेट्रोलपंपांवरील यंत्रांमध्ये हेराफेरी केल्याचे समोर आले आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हा